JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / वयाच्या 5 व्या वर्षी अंतोनेयाच्या प्रेमात पडला मेस्सी, 2 मुलं झाल्यानंतर केले लग्न

वयाच्या 5 व्या वर्षी अंतोनेयाच्या प्रेमात पडला मेस्सी, 2 मुलं झाल्यानंतर केले लग्न

Football विश्वातला महान खेळाडू बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सीच्या अजब प्रेमाची गजब कहाणी..

0107

फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक लिओनेल मेस्सीची प्रेमकहाणीही काहीशी वेगळी आहे. लहानपणी खूप लाजाळू असलेल्या मेस्सीने वयाच्या पाचव्या वर्षी प्रथमच पत्नी अंतोनेया रोकुजोला पाहिले. मेस्सीने आयुष्यातील 34 वर्षांपैकी अंतोनेयाच्या प्रेमात 29 वर्षे घालविली आहेत.

जाहिरात
0207

मेसीने अंतोनेयाला पहिल्यांदा त्याचा चुलतभाऊ लुकासबरोबर पाहिले. लुकास आणि मेसी हे फक्त भावंडं नव्हे तर खूप चांगले मित्र होते. वयाच्या नवव्या वर्षी मेस्सी पूर्णपणे अंतोनेयाच्या प्रेमात वेडा झाला होता. त्यावेळी, तो आपल्या मित्रांना पत्र लिहायचा की एक दिवस अंतोनेयाही त्याच्या प्रेमात पडेल.

जाहिरात
0307

जगभर प्रसिद्धी मिळाल्यानंतरही मेस्सी त्याचं बालपणातलं प्रेम विसरला नाही. 2009 साली मेस्सीने सर्वप्रथम आपल्या प्रेमिकेचं नाव जगाला सांगितलं.

जाहिरात
0407

मेस्सीच्या नात्याचा खुलासा झाल्यानंतर अंतोनेया त्याच्याबरोबर स्पेनमध्ये राहू लागली. 2 जून, 2012 रोजी मेस्सीने इक्वाडोरविरुद्ध गोल केल्यावर त्यांनी फुटबॉल त्याच्या जर्सीच्या आत टाकला. मेस्सीला जगाला हे सांगायचं होता की लवकरच तो बाबा बनणार आहे. त्याच वर्षी अंतोनेयाने त्यांचं पाहिलं मूल थिएगोला जन्म दिला.

जाहिरात
0507

मेस्सीचा दुसरा मुलगा मतिओचा जन्म 2015 मध्ये झाला होता. विशेष म्हणजे पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डोनेही आपल्या मुलाचे नाव मतिओ ठेवले आहे. मेसीने 30 जून, 2017 रोजी दोन मुलांच्या जन्मानंतर अंतोनेयाशी लग्न केले.

जाहिरात
0607

लग्नाच्या एक वर्षा नंतर मेस्सी तिसऱ्यांदा बाबा झाला. मेस्सी आणि अंतोनेया यांनी या मुलाचे नाव सिरो ठेवले आहे

जाहिरात
0707

मेस्सीने आपल्या कारकीर्दीत 674 गोल केले आहेत. मेस्सीने बार्सिलोनाकडून 520 सामन्यांत 474 गोल केले आहेत. मेस्सी हा सर्वात जास्त वेळा बेलेन डी ऑर जिंकणारा खेळाडू आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या