JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / समलैंगिक पार्टनरशी लग्न केल्यानंतर महिला क्रिकेटपटूने दिली 'गूड न्यूज', बाळाचा PHOTO केला शेयर

समलैंगिक पार्टनरशी लग्न केल्यानंतर महिला क्रिकेटपटूने दिली 'गूड न्यूज', बाळाचा PHOTO केला शेयर

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू मेगन शटच्या (Megan Schutt) घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर तिने ही गूड न्यूज दिली आहे. मेगनची पार्टनर जेस होलोएकने (Jess Holyoake) मुलीला जन्म दिला आहे.

जाहिरात

समलैंगिक पार्टनरसोबत संसार थाटल्यानंतर मुलीला जन्म

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू मेगन शटच्या (Megan Schutt) घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर तिने ही गूड न्यूज दिली आहे. मेगनची पार्टनर जेस होलोएकने (Jess Holyoake) मुलीला जन्म दिला आहे. मेगन आणि जेस यांनी मुलीचं नाव राईली लुईस शट ((Rylee Louise Schutt) ठेवलं आहे. राईलीचा जन्म 17 ऑगस्टला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झाला. 28 आठवडे आणि 6 दिवसांनी तिचा जन्म झाला, असं मेगनने सांगितलं. मेगनने 2019 साली बराच काळ पार्टनर राहिलेल्या जेस होलोएकसोबत लग्न केलं. यावर्षी मे महिन्यात मेगनने आपली पार्टनर प्रेगनंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. मेगन जेससोबतचे आपले बरेच फोटो शेयर करत असते. ‘राईली लुईस शट- 17/08/21 रात्री 10.09 वाजता, 28 आठवडे 6 दिवस, वजन 858 ग्राम,’ असं मेगनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं. मुलीच्या जन्मानंतर तिने काही फोटोही पोस्ट केले आहेत.

संबंधित बातम्या

‘आमच्या मुलीचा जन्म सी सेक्शनमध्ये झाला. 24 आठवड्यांनंतर काही अडचणींमुळे मुलीचा जन्म कधीही होऊ शकतो, असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. जवळपास 5 आठवड्यांपासून आम्ही बॅग पॅक करूनच बसलो होतो. या सगळ्याचा भाग बनणं अविश्वसनीय आहे. मी माझ्या पत्नीबाबत अभिमानी आहे. ती किती चांगली आई बनेल, हे मला आधीपासूनच माहिती आहे. माझ्या आयुष्यात या दोन सुंदर मुली आल्या आहेत, मी खरंच नशीबवान आहे,’ अशी पोस्ट मेगनने लिहिली आहे. मेगन ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू आहे. अनेक सामन्यांमध्ये तिने ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. जेस होलोएकची पार्श्वभूमी मात्र क्रिकेटशी संबंधित नाही. 2017 मध्ये तिला मेगनने प्रपोज केलं होतं, 5 सेकंदात तिने ते स्वीकारलं देखील होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या