JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / काश्मीरच्या खतरनाक विक्टर फोर्समध्ये 15 दिवस ट्रेनिंग करणार धोनी!

काश्मीरच्या खतरनाक विक्टर फोर्समध्ये 15 दिवस ट्रेनिंग करणार धोनी!

धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत 15 दिवस काश्मीरमध्ये सैन्यासोबत सराव करणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काश्मीर, 25 जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं देशसेवा करण्याच्या दिशेने एक पाऊल उचललं आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत असताना आता धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाता लष्करात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्याबरोबर सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या कालावधीत धोनी 106 क्षेत्रीय सेनेसोबत राहणार आहे. लष्करातील सर्वात खतरनाक असलेल्या विक्टर फोर्समध्ये धोनी ट्रेनिंग घेणार आहे. या कालावधीत धोनी गार्ड आणि इतर पोस्ट ड्यूटी करणार आहे. यासंदर्भात IANS शी बोलताना लष्करातील सूत्रांनी सांगितले की,‘‘धोनीनं भारतीय क्रिकेटला खुप काही दिले आहे आणि त्याचे लष्कराप्रती असलेले प्रेम सर्वांना माहित आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला ते जमले नाही. पण, आता तो लष्कराचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला आहे.’’

संबंधित बातम्या

लष्करप्रमुखांनी धोनीला दिली होती परवानगी लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला लष्करप्रमुखांनी सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असल्यानं त्या रेजिमेंटमधूनच सराव करणार आहे. या रेजिमेंटचा सराव जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे. धोनीला सरावात भाग घेता येणार असला तरी लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे. ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या