JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Year Ender 2021 : यावर्षी Rohit Sharma साठी या गोष्टी ठरल्या लकी, पाहा 2021 मधील परफेक्ट PHOTOS

Year Ender 2021 : यावर्षी Rohit Sharma साठी या गोष्टी ठरल्या लकी, पाहा 2021 मधील परफेक्ट PHOTOS

Rohit Sharma : 2021 हे वर्ष आता भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा साठी लकी ठरलं आहे. कारण त्याला आता भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळं आता 2021 च्या त्याच्या सर्वोत्तम क्षणांवर एक नजर टाकूयात, पाहा PHOTOS

0110

रोहित शर्मा सध्या नॅशनल क्रिकेट अकादमी बंगळुरूमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा उपचार करत आहे. यामुळं तो NCA मध्ये आगामी U-19 आशिया चषक स्पर्धेची तयारी करत असलेल्या U-19 खेळाडूंशी तो संवाद साधताना दिसला.

जाहिरात
0210

दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरूद्ध न खेळू शकणारा रोहित सध्या तंदुरुस्तीचं प्रशिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी BCCI ने रोहितला वनडे आणि टी-20 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार होणार असल्याचं घोषित केलं होतं.

जाहिरात
0310

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माला चाहत्यांनी Sehri Babu या गाण्यावर नाचताना पाहिलं होतं.

जाहिरात
0410

जेव्हा भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका 3-0 ने जिंकली तेव्हा रोहित शर्माने संघाचं नेतृत्व केलेलं होतं. त्यामुळं त्याच्यावर भारतीय संघाची धुरा सोपवण्यात यावी असं बोललं जात होतं.

जाहिरात
0510

यूएईमध्ये आयपीएल संपल्यानंतर रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा सोबत मुंबईत पोहचला होता, त्याचा हा फोटो.

जाहिरात
0610

रोहित शर्मा हा 2007 मध्ये ICC T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्यामुळं त्यानं त्याच्या आठवणीत हा फोटो शेयर केला होता.

जाहिरात
0710

यावर्षीच्या त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्याच्या 127 धावांच्या खेळीमुळे तो सामनावीर ठरला होता. भारताने हा सामना 157 धावांनी जिंकला होता.

जाहिरात
0810

न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंत आणि रोहित या स्फोटक जोडीचा हा मजेदार फोटो आहे. या फोटोचीही फार चर्चा झाली होती.

जाहिरात
0910

कोरोनामुळं जवळपास एक वर्ष क्रिकेट सामने होऊ शकले नव्हते. त्यावेळी रोहितने संघातील काही खेळाडूंना VIDEO CALL करून ओपन चर्चा केली होती. त्याची ही क्लूप्ती चाहत्यांना फार आवडली होती.

जाहिरात
1010

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा फार यशस्वी राहिलेला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडं अनुभवी आणि यंगस्टर खेळाडूंची एक मोठी फळी होती. त्यामुळं IPL मध्ये मुंबई बलाढ्य टिम बनली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या