मेस्सीने दुसऱ्यांदा पटकावला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब!
मुंबई, 28 फेब्रुवारी : आज फिफा अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली असून यात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला आहे. या पुरस्कारासह मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अर्जेंटिनाच्या संघाने 2022 मध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली कतार येथे आयोजित फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याविजयासह त्याने तब्बल 36 वर्षानंतर फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तेव्हा आज फिफा अवॉर्ड्सच्या घोषणे दरम्यान मेस्सीला पॅरिसमध्ये 2022 सालचा फिफा प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवला असून 2019 मध्ये त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांनी दोनदा फिफा चा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार क्रिकेटच्या देवाचा पुतळा अर्जेंटिनाच्या संघात मेस्सीच्या व्यतिरिक्त अर्जेंटिनालावर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांना देखील फिफाने 2022 वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. तसेच अर्जेंटिना संघाचा गोल कीपर एसी मार्टिनेझ याला फिफा गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर करण्यात आला. महिला गटात सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार स्पॅनिश खेळाडू अलेक्सिया पुटेलसला देण्यात आला.