JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : पंतच्या करिअरला लागला सुरुंग! सामन्यानंतर राहुलनेच उडवली ऋषभची खिल्ली

VIDEO : पंतच्या करिअरला लागला सुरुंग! सामन्यानंतर राहुलनेच उडवली ऋषभची खिल्ली

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं आता 1-0ने आघाडी मिळवली. मात्र या सामन्यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलने.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऑकलंड, 25 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विराटसेनेनं उत्कृष्ठ सांघिक खेळी करत विजय मिळवला. त्यामुळं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं आता 1-0ने आघाडी मिळवली. मात्र या सामन्यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलने. पंतच्या जागी किपिंग करणाऱ्या राहुलनं फलंदाजीमध्ये सातत्य राखले आहे. त्यामुळं पंतचे करिअर धोक्यात आले आहे. पहिल्या टी-20 सामन्यात राहुलनं 27 चेंडूत 56 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावरच भारतानं 204 धावांचे लक्ष्य सहज पार केले. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलला पंतबाबत विचारले असता, त्यान मजेदार पद्धतीने उत्तर दिले. राहुलनं, “तुला वाटते का ती पंत पुन्हा संघात पुनरागमन करेल?”, असे विचारले असता त्यानं, “या गोष्टी माझ्या हातात नाही” असे उत्तर दिले. वाचा- VIDEO : भारताला मिळाला नवा धोनी! श्रेयस अय्यरचा विजयी षटकार

संबंधित बातम्या

वाचा- VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? हवेत उडी मारत रोहितनं घेतला अविश्वसनीय कॅच किपिंगच्या जबाबदारीमुळे खुश आहे राहुल राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत पंतच्या जागी किपिंग केली होती. त्यावेळी पंत जखमी झाला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलनं फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. त्यानंतर विराट कोहलीनं 2003च्या वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडनं जी भुमिका बजावली होती, तशीच कामगिरी राहुल करेल, असे सांगितले होते. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही राहुलच विकेटकिपरची भुमिका पार पाडेल, असे दिसत आहे. वाचा- विराटसेनेचा विजयी शुभारंभ! टीम इंडियानं 6 विकेटनं जिंकला सामना ‘किपिंग करणे फायद्याचे’ न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20नंतर राहुलने, “खर सांगायचे तर मला किपिंग करणे आवडते. आंतरराष्ट्रीय स्थरावर हा अनुभव नवीन वाटतो, मात्र आयपीएलमध्ये ही भुमिका मी पार पाडली आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा किपिंग करण्याचा प्रयत्न मी करतो. विकेटकिपिंगचा अभ्यासही मी करतो”, असे सांगितले. तसेच, किपिंग केल्यामुळं खेळपट्टीचा अंदाजही चांगला येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या