JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पीटरसनचं Pan Card हरवलं, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत, उत्तर आलं...

पीटरसनचं Pan Card हरवलं, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत, उत्तर आलं...

इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याचं पॅन कार्ड (Pan Card) हरवलं आहे. याबाबतची माहिती पीटरसनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याचं पॅन कार्ड (Pan Card) हरवलं आहे. याबाबतची माहिती पीटरसनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. हरवलेलं पॅन कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी पीटरसनने मदत मागताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) टॅग केलं. 41 वर्षांचा पीटरसन स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करताना अनेकवेळा दिसतो. माझं पॅन कार्ड हरवलं आहे, भारताचा दौरा करण्याआधी आपल्याला याची गरज आहे, असं पीटरसन त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. ‘भारत कृपया मला मदत करा. माझं पॅन कार्ड हरवलं आहे आणि मी सोमवारी प्रवास करत आहे. कामासाठी या कार्डची गरज असते. मला कृपया अशा व्यक्तीची माहिती द्या, ज्यांच्यासोबत मी संपर्क करू शकतो,’ असं ट्वीट पीटरसनने हिंदी आणि इंग्रजीमध्ये केलं. या ट्वीटमध्ये पीटरसनने पंतप्रधान मोदींनाही टॅग केलं.

पीटरसनच्या या ट्वीटवर भारतीय आयकर विभागाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर तुमच्याकडे पॅन कार्डबाबत माहिती असेल, तर याठिकाणी अप्लाय करा, ज्यामुळे तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड मिळेल,’ अशी माहिती आयकर विभागाने दिली. या माहितीसोबतच विभागाने काही लिंकही शेयर केल्या आहेत. जर पॅन कार्ड बाबत काही माहिती नसेल आणि फिजिकल कार्डसाठी पॅनचा ऍक्सेस पाहिजे असेल तर या ई-मेलवर आम्हाला संपर्क करा, असंही आयकर विभागाने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणलं.

संबंधित बातम्या

जाहिरात

पीटरसनने आयकर विभागाच्या या ट्वीटवर त्यांना धन्यवाद दिले आणि आपण ई-मेल केला असल्याचं तसंच तुम्हाला फॉलो केलं असल्याचंही सांगितलं. मला तुमची एखादी व्यक्ती मेसज करू शकते का? ज्यामुळे मी त्यांच्याशी संपर्क करेन, असंही पीटरसनने विचारलं. इंग्लंडकडून 100 पेक्षा जास्त टेस्ट खेळलेला पीटरसन आयपीएलमध्ये दिल्ली, डेक्कन चार्जर्स, पुणे आणि बँगलोरकडून खेळला आहे. तसंच त्याने भारतात गेंड्यांच्या शिकारीवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं. इंग्लंडकडून खेळताना पीटरसनने 104 टेस्टमध्ये 23 शतकांच्या मदतीने 8181 रन केले. 227 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. 136 वनडे सामन्यांमध्ये पीटरसनच्या नावावर 4,440 रन आणि 9 शतकं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या