भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने तिच्या ऑफिशियल Instagram अकाऊंटवरून एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि या हनिमून कपलचे फोटो व्हायरल झाले.
जसप्रीत बुमराहने याच महिन्यात एका घरगुती कार्यक्रमात आणि मोजक्यांच्या उपस्थितीत लग्नाची गाठ बांधली. संजना ही त्याची बायको प्रसिद्ध अँकर आहे.
या फोटोत संजना बीचवर उभी आहे तिने हातात त्याच बांगड्या घातल्या आहेत ज्या तिने रिसेप्शनमध्ये घातल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी जसप्रीतनेही बीच वरचा एक फोटो शेयर केला होता त्यांनी संजना प्रमाणेच थ्रो बॅक कॅप्शन लिहिले
जसप्रीत बुमराहने बायको संजनाला वाढदिवसाबद्दल 6 मे रोजी खूप रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या.