JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : सामना जिंकल्यावर गौतम गंभीरने RCB च्या चाहत्यांना डिवचलं Video Viral

IPL 2023 : सामना जिंकल्यावर गौतम गंभीरने RCB च्या चाहत्यांना डिवचलं Video Viral

चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडलेला सामना यंदाच्या आयपीएल सिजनमधील सर्वात चर्चेत राहिला. विजयानंतर गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना डिवचण्यासाठी एक इशारा केला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जाहिरात

सामना जिंकल्यावर गौतम गंभीरने RCB च्या चाहत्यांना डिवचलं Video Viral

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11  एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 10 एप्रिल रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडलेला सामना यंदाच्या आयपीएल सिजनमधील सर्वात चर्चेत राहिला. या रोमांचक सामन्यात लखनऊच्या टीमने आरसीबीला त्यांच्या होम ग्राउंडवर पराभवाची धूळ चारली. विजयानंतर गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना डिवचण्यासाठी एक इशारा केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहली, मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर लखनऊ समोर विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करताना लखनऊची सुरुवात खराब झाली परंतु यानंतर निकोलस पुरन आणि इतर फलंदाजांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे लखनऊ सुपर जाएंट्सने हा आव्हान पूर्ण करून सामना जिंकला. शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या

लखनऊ सुपर जाएंट्सने 1 विकेटने हा सामना जिंकल्यानंतर लखनऊच्या डग आउटमध्ये एकच जल्लोष झाला. संपूर्ण सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सचा मार्गदर्शक भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर हा अत्यंत गंभीर दिसत होता. परंतु सामना जिंकल्यानंतर त्याने उडी मारून आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारली आणि जोशपूर्ण हातवारे करू लागला.- विजयानंतर मैदानात गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांकडे बघून तोंडावर बोट ठेऊन गप्प राहा असा इशारा केला. गंभीरच्या या कृतीमुळे आरसीबीचे चाहते नाराज झाले असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या