बँगलोर, 12 फेब्रुवारी: बँगलोरमध्ये सुरू असलेल्या आयपीएल लिलावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएलचा लिलाव घेणारे ह्यू एडमिडास (Hugh Edmeades) बोली सुरू असतानाच कोसळले आहेत. वानिंदू हसरंगावर बोली सुरू असताना एडमिडास यांना चक्कर आली, त्यामुळे लिलाव थांबवण्यात आला आहे. वानिंदू हसरंगासाठी आरसीबीने 10.75 कोटींची बोली लावली, यानंतर एडमिडास कोसळले, त्यामुळे दुपारी 3.30 पर्यंत लिलाव थांबवण्यात आला आहे. आता लंचनंतर पुन्हा लिलाव सुरू होईल.
ब्रिटनचे रहिवासी असलेले एडमिडास हे 2018 पासून आयपीएलचा लिलाव घेत आहेत. याआधी पहिल्या मोसमापासून रिचर्ड मॅडली यांच्याकडे ही जबाबदारी होती. 36 वर्षांमध्ये एडमिडास यांनी जगभरात 2500 पेक्षा जास्त लिलाव घेतले आहेत.