मुंबई, 15 फेब्रुवारी : आयपीएलची ट्रॉफी चारवेळा जिंकणारी एमएस धोनीची (MS Dhoni) टीम चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) झाला. या लिलावामध्ये चेन्नईने विकत घेतलेल्या एका खेळाडूवर त्यांचे चाहते चांगलेच संतापले आहेत. या क्रिकेटपटूचं नाव आहे महीश तिक्षणा (Maheesh Theekshana). या क्रिकेटपटूला सीएसकेने विकत घेतल्यामुळे #BoycottChennaiSuperKings हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. चेन्नई सुपरकिंग्सने श्रीलंकेचा युवा फास्ट बॉलर तिक्षणाला 70 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. तिक्षणाची बेस प्राईज 20 लाख रुपये होती. श्रीलंकेच्या या फास्ट बॉलरला विकत घेतल्यानंतर चाहत्यांनी सीएसकेच्या बहिष्काराची मागणी केली आहे. सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून महीश तिक्षणाचा एक फोटो शेयर केला आहे. ’ महीश इन द येलो फेम! सुपर ऑक्शन’, असं कॅप्शन सीएसकेने या फोटोला दिलं. यावर एका यूजरने लिहिलं, ‘पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये बॅन होतात कारण ते भारताचे शत्रू आहेत, पण तामीळचे शत्रू असलेले श्रीलंकन सीएसके टीममध्ये असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आपले गुन्हे क्रिकेटमधून साफ करते.’
तामीळनाडू आणि श्रीलंका यांच्यातल्या वादाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, याचे पडसाद तिक्षणाच्या निवडीमुळे उमटली आहे. तिक्षणा श्रीलंकेचा खेळाडू आहे, तर सीएसके तामीळनाडूची टीम आहे. तामीळ टीम असूनही श्रीलंकेच्या खेळाडूला स्थान दिल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 2009 साली तामिळींवर झालेल्या अत्याचाराला श्रीलंकन सैनिकांना जबाबदार धरण्यात आलं होतं.