JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 Auction : IPL जिंकण्यासाठी कुंबळेचा खास प्लॅन, दिग्गज मुंबईकर खेळाडू झाला पंजाबचा बॅटिंग कोच

IPL 2020 Auction : IPL जिंकण्यासाठी कुंबळेचा खास प्लॅन, दिग्गज मुंबईकर खेळाडू झाला पंजाबचा बॅटिंग कोच

पहिल्या विजेतेपदासाठी संघाचा संचालक अनिल कुंबळे यानं संघ बांधणीसाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गुरूवारी लिलाव झाला. यात आतापर्यंत एकही विजेतेपद न जिंकलेल्या पंजाब संघानं ग्लेन मॅक्सवेल 10.75 कोटी खर्च करून विकत घेतले. तर, वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉटरलसाठी 8.50 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळं तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब पहिल्या विजयासाठी सज्ज आहे. पहिल्या विजेतेपदासाठी संघाचा संचालक अनिल कुंबळे यानं संघ बांधणीसाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. तर, फलंदाज प्रशिक्षक म्हणून एका दिग्गज मुंबईकराची निवड केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवलेले नाही. या संघानं 2014मध्ये गुणतालिकेत चांगली कामगिरी केली होती. 2014मध्ये पंजाबनं 14 सामन्यांपैकी 11 सामने जिंकले होते, तर 2008मध्ये पंजाबचा संघ सेमीफायनलपर्यंत पोहचला होता. त्यामुळं 2020मध्ये अशीच कामगिरी करण्यासाठी अनिल कुंबळेचा संघ सज्ज आहे. आता पंजाबनं फलंदाजी प्रशिक्षक म्हणून वसीम जाफरची (Wasim Jaffer) नियुक्ती केली आहे. वसीम जाफरने भारतासाठी 31 कसोटी तर, 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आता आयपीएलमध्ये जाफर पंजाब संघाकडून खेळतील.

कुंबळेने जाफरला केले फलंदाजीचे प्रशिक्षक किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या आदेशानुसार वसीम जाफरने फलंदाजी प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे. 41 वर्षीय जाफर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 2008 मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता, तरीही त्याची कामगिरी चांगली नव्हती. परंतु फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही तो चांगली कामगिरी करेल अशी त्याला आशा आहे. जाफरचा पंजाबला कसा फायदा होईल? वसीम जाफरला सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. वयाच्या 41 व्या वर्षी तो रणजी करंडकही खेळत आहे आणि विदर्भाला रणजी चॅम्पियनही त्याने बनविले आहे. तरुण खेळाडूंबरोबर काम करण्याचा जाफरला खूप अनुभव आहे. युवा खेळाडूंची कौशल्ये मैदानावर कशी ठेवायची हे जाफरला माहित आहे. वसीम जाफरच्या फलंदाजीच्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की तो एक उत्कृष्ठ खेळाडू आहे. जाफरने 254 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 19 हजार 147 धावा केल्या असून त्याची सरासरी 51.05 आहे. जाफरने प्रथम श्रेणीत 57 शतके आणि 88 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने यादी अ क्रिकेटमध्ये 10 शतके आणि 33 अर्धशतके झळकावली आहेत. किंग्स इलेवन पंजाबचा संघ टॉप ऑर्डर फलंदाज: केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, करुण नायर, मनदीप सिंह, प्रभसिमरन सिंह. फिनिशर: निकोलस पूरन, सरफराज खान. ऑलराउंडर: ग्लेन मॅक्सवेल, दीपक हूड्डा, जेम्स नीशम, क्रिस जोर्डन. स्पिनर: मुरुगन अश्विन, मुजीब उर रहमान, के गौतम, जे सूचित, हरप्रीत बरार, रवि बिश्नोई, तजिंदर ढिल्लन. जलद गेंदबाज: मोहम्मद शमी, हरदुस विलजोएन, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, शेल्डन कोटरेल, इशान पोरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या