JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : कवी मनाचा विराट! विराटने रचलेली कविता ऐकून चाहत्यांना मिळाली प्रेरणा

IPL 2023 : कवी मनाचा विराट! विराटने रचलेली कविता ऐकून चाहत्यांना मिळाली प्रेरणा

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून मुंबई विरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात 82 धावांची नाबाद खेळी केली. असे असतानाच क्रिकेट व्यतिरिक्त विराट कोहलीच आणखीन एक टॅलेंट जगासमोर आलं आहे.

जाहिरात

कवी मनाचा विराट, विराटने रचलेली कविता ऐकून चाहत्यांना मिळाली प्रेरणा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 एप्रिल : सध्या देशभरात आयपीएल 2023 ची धामधूम सुरु आहे. सर्व फॅन्स आपल्या आवडत्या टीमला चिअर करत असून यानिमित्ताने क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून मुंबई विरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात 82 धावांची नाबाद खेळी केली. असे असतानाच क्रिकेट व्यतिरिक्त विराट कोहलीच आणखीन एक टॅलेंट जगासमोर आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने विराट कोहली चा मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडिओ ट्विट केला असून यात विराटने स्वरचित कविता ऐकवून दाखवली आहे. ही कविता अत्यंत प्रेरणादायी असून केवळ 8 शब्दांचा वापर करून विराटने ही कविता रचली आहे. सध्या विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विराटाचे चाहते त्यावर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

आयपीएल 2023 च्या निमित्ताने मिस्टर नॅग्स याने विराट कोहलीची मुलाखत घेतली. या मुलाखतीत विराटला मिस्टर नॅग्सने  पोएट्री चॅलेंज म्हणजेच कविता करण्याचे चॅलेंज दिले होते.  ज्यामध्ये त्याने विराटला फक्त आठ शब्द दिले आणि कविता लिहिण्यास सांगितले. नॅग्सने विराटला फायर, बॅट, पिकल, टाइड, डकस मॅन आणि 49 हे शब्द दिले होते.

संबंधित बातम्या

विराटने दिलेल्या शब्दांची अचूक सांगड घालून सुंदर कविता रचली. याचा अर्थ असा होता की, “तुमच्या इच्छा पूर्ण करा, तुमच्यातील आग प्रज्वलित करा, कठीण काळात फलंदाजी करा, यामध्ये कधी 263 होतील तर  कधी 49 . आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतील पण या परिस्थितीतही तुम्ही आनंदी राहायला आणि हसायला विसरू नका. तुम्हचे शतक होवो अथवा डक आउट आयुष्य हे पुढे चालूच राहते तुम्ही थांबू नका, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या