JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : IPL मध्ये कोहलीचा 'विराट' पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू

IPL 2023 : IPL मध्ये कोहलीचा 'विराट' पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करून आयपीएल कारकिर्दीत 7 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

जाहिरात

IPL मध्ये कोहलीचा 'विराट' पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 मे : आयपीएल 2023 मध्ये 50 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार कामगिरी करून आयपीएल कारकिर्दीत 7 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी आरसीबीकडून फलंदाजीसाठी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसयांची जोडी मैदानात उतरली. तेव्हा विराट कोहलीने 19 धावा करताच आपल्या नावावर मोठा रेकॉर्ड नोंदवला. विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 7 हजार धावांचा टप्पा ओलांडला असून अशी कामगिरी करणारा विराट हा आयपीएलमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीत 233 सामने खेळले असून यात 7000 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट प्रथम क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन आहे. शिखर धवनने 213 सामन्यांमध्ये 6535 केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 6189 धावांसह दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर तर चौथ्या क्रमांकावर 6063 धावांसह मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या