IPL 2023 मध्ये मोठा उलटफेर, हैदराबादने राजस्थानच्या तोंडातून खेचून आणला विजय
मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 मध्ये 52 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सनवर 4 विकेट्सने विजय मिळवला. जयपूर येथील राजस्थान रॉयल्सच्या होम ग्राउंडवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांची जोडी मैदानात उतरली. जोस बटलरने केवळ 59 चेंडूवर 95 धावा केल्या. तर संजू सॅमसनने देखील यशस्वी जयस्वालनंतर संघाचा डाव सावरताना 38 चेंडूत 66 धावा केल्या. याशिवाय राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 35 धावा केलया. राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये केवळ 2 विकेट्स देऊन 214 धावांची कामगिरी केली. विजयासाठी 215 धावांचे आव्हान मिळाल्यावर सनराइजर्स हैदराबादकडून अनमोल प्रीत सिंह आणि अभिषेक शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. विजयासाठी 215 धावांचे आव्हान मिळाल्यावर सनराइजर्स हैदराबादकडून अनमोल प्रीत सिंह आणि अभिषेक शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. सनरायजर्स हैदराबादकडून अनमोल प्रीत सिंहने 33, अभिषेक शर्माने 55, राहुल त्रिपाठीने 47, हेन्रीचं क्लासेनने 26 , ग्लेन फिलिप्सने 25 तर अब्दुल समदने 17 धावा केल्या. 17 ओव्हरमध्ये युझवेंद्र चहलने राहुल त्रिपाठी आणि हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमची विकेट घेऊन सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकवला. परंतु अखेरच्या 2 ओव्हरमध्ये ग्लेन फलिप्स आणि अब्दुल समदने चौकार षटकारांची अतिशबाजी करून राजस्थानकडून विजय खेचून आणला.
19 व्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेलने राजस्थानचा गोलंदाज कुलदीप यादवची धुलाई केली. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले तर चौथ्या चेंडूंवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा करून एका ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा काढलया. तर शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला 17 धावांची गरज असताना संजू सॅमसनने संदीप शर्माच्या हातात चेंडू दिला. संदीप शर्मा हैदराबादची रन मशीन रोखेल असा विश्वास राजस्थानच्या चाहत्यांना होता. काही स्थरावर संदीप शर्माला गोलंदाजीत यश देखील आले होते. दुसऱ्या चेंडूवर समदने मारलेला सिक्स वगळता संदीप शर्माच्या इतर सर्व चेंडूवर हैदराबादने 2 आणि 1 धावा केलया होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये सनराइजर्स हैदराबादला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना संदीप शर्माने यॉर्कर बॉल टाकला, या बॉलवर हैदराबादच्या खेळाडूंनी एक धाव घेतल्याने राजस्थानचा विजय पक्का झाला होता. परंतु संदीपने टाकलेला शेवटच्या चेंडूला अंपायर्सने नो बॉल करार दिला. त्यामुळे सामन्यात मोठा ट्विस्ट आला, आता हैदराबादला 1 चेंडूवर 3 धावांची आवश्यकता होती. संदीपने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर अब्दुल समदने षटकार ठोकत हरलेला सामना हैदराबादला जिंकवून दिला.