JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 RR vs SRH : राजस्थान रॉयल्ससाठी बटलर आणि यशस्वीची 85 धावांची पार्टनरशीप

IPL 2023 RR vs SRH : राजस्थान रॉयल्ससाठी बटलर आणि यशस्वीची 85 धावांची पार्टनरशीप

आयपीएलचा चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सुरु असून राजस्थान रॉयल्स कडून सलामीसाठी आलेल्या फलंदाजांनी अवघ्या 6 ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सने 85 धावांचा टप्पा गाठला.

जाहिरात

राजस्थान रॉयल्ससाठी बटलर आणि यशस्वीची 85 धावांची पार्टनरशीप

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 एप्रिल : आयपीएलच्या 16 व्या सीजनला 31  मार्च पासून सुरुवात झाली आहे. आज आयपीएलचा चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सुरु असून राजस्थान रॉयल्स कडून सलामीसाठी आलेल्या फलंदाजांनी अवघ्या 6 ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सने 85 धावांचा टप्पा गाठला. त्यामुळे पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सुरुवात अतिशय उत्तम झाली. सनरायजर्स हैद्राबाद यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच राजीव गांधी स्टेडियमवर आयपीएलचा चौथा सामना सुरु असून सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकून सनरायजर्स हैद्राबादने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थान रॉयल्सची टीम फलंदाजीसाठी मैदानात आली. राजस्थान टीमकडून जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल हे दोघेजण सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले. या दोघांनी सुरुवातीपासूनच चौकार आणि शटकारांची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली.

जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी 6 ओव्हरमध्ये 85 धावांची भागीदारी केली. यात जॉस बटलरने 22 चेंडूत 54 धावाकरून अर्धशतकीय खेळी केली. तर यशस्वीने ३२ धावा केल्या होत्या, परंतु 6 व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर फजलहक फारुकी याला बटलरची विकेट घेण्यात यश आले. तर जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांची भागीदारी तुटली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या