काय आहे
Impact Player चा नियम?

आयपीएल 2023 ला सुरुवात झाली आहे. यावर्षी स्पर्धेत अनेक नवीन नियम लागू झाले असून त्यात Impact Player चा नियम अतिशय महत्वाचा ठरत आहे.

पहिल्या सामन्यात चेन्नई संघाचा तुषार देशपांडे हा IPL चा पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरला.

धोनीने पहिल्या इनिंगनंतर तुषारला अंबाती रायडू ऐवजी मैदानात उतरवले.

नियमानुसार टॉसच्यानंतर सामना सुरु असताना कोणत्याही क्षणी इम्पॅक्ट प्लेयरला प्लेईंग 11 मध्ये असणाऱ्या खेळाडूच्या ऐवजी मैदानात उतरवले जाऊ शकते.

इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू केल्याने आता मॅचमध्ये 11 च्या ऐवजी 12 खेळाडू खेळू शकणार आहेत.

बीसीसीआयने याच वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा नियम लागू केला होता.

नियमानुसार संघाला टॉसनंतर प्लेयिंग 11 सांगताना 5 अतिरिक्त खेळाडूंची नाव सांगणे देखील गरजेचे असणार आहे.

जर प्लेयिंग 11 मध्ये 4 विदेशी खेळाडू असतील तर इम्पॅक्ट प्लेअर  हा भारतीय असणे गरजेचे आहे.

सदर नियमामुळे भारतीय खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध होऊ शकेल हा या नियमामागचा उद्देश आहे.