मुंबई : IPL २०२३ मध्ये लखनऊ विरुद्ध खेळताना RCB ला मॅच गमवावी लागली. शेवटच्या दोन ओव्हरने संपूर्ण चित्रच बदललं. हातून मॅचही गेली आणि पैसेही अशी अवस्था झाली. RCB चा कॅप्टन फाफ ड्युप्लेसिसला सामना झाल्यानंतर दंड भरावा लागला आहे. यामुळे RCB ला मोठा धक्का बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन फाफ डुप्लेसिसला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात नियम मोडल्यानं 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय आवेश खानला वॉर्निग देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात आयपीएलच्या आचारसंहितेचे आरसीबीचे हे पहिले उल्लंघन केल्याचं सांगण्यात आलं आहे.लखनऊ सुपरजायंट्सच्या आवेश खानलाही आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले, त्यानंतर त्याने आपली चूक मान्य केली.
IPL 2023 RCB vs LSG : 16 कोटींच्या खेळाडूचं बंगळुरूमध्ये वादळ! आरसीबी विरुद्ध ठोकल सणसणीत अर्धशतकRCB विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ जाएंट्सने विजय मिळवला आहे. लखनऊने एक विकेट राखून हा विजय मिळवला आहे. अटीतटीच्या सामन्यात निकोलस पूरन मॅच विनर ठरला. निकोलस पुरनने 18 चेंडूत 62 धावा करण्याचा पराक्रम केला. त्याने या सामन्यात केवळ 15 चेंडूत 51 धावा ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मार्कस स्टॉइनिसने 65, आयुष बडोनी यांनी 30 धावा केल्या.
IPL 2023 : बंगळुरुमध्ये पुरनच वादळ! लखनऊचा आरसीबीवर थरारक विजयशेवटच्या ओव्हरमध्ये सामना अतिशय रोमांचक बनला आणि अखेर लखनऊ सुपर जाएंट्स या आरसीबीवर 1 विकेटने विजय मिळवला.