आर अश्विनने पुन्हा केला मंकडिंगचा प्रयत्न! पंजाब किंग्सच्या कर्णधाराला दिली वॉर्निंग
मुंबई, 5 एप्रिल : जगप्रसिद्ध टी 20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज आयपीएल2023 च्या आठव्या सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु असून राजस्थानचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने पुन्हा एकदा विकेट घेण्यासाठी मंकडिंगचे हत्यार बाहेर काढले आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात आर अश्विनने पुन्हा एकदा मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडीयमवर पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरु आहे. यात पंजाब किंग्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन जबरदस्त फलंदाजी केली. शिखर धवनने 56 चेंडूंमध्ये संघासाठी 86 धावांची नाबाद खेळी. तर प्रभसिमरन सिंहने 34 चेंडूत 60 धावा करून संघाला मोठी लीड मिळवून दिली. पंजाब किंग्सने राजस्थान विरुद्ध फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन 197 धावा केल्या. तर राजस्थानकडून जेसन होल्डरने 2 विकेट तर आर अश्विन आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
सामन्यादरम्यान आर अश्विनने गोलंदाजीसाठी आला, तेव्हा शिखर धवन नॉन स्ट्राईकवर उभा होता. शिखर धवन बऱ्याचदा रन काढण्याच्या नादात नॉन गोलंदाज बॉल टाकण्याच्या आधीच स्ट्राईक सोडत होता. आर अश्विनच्या ते लक्षात आले आणि त्याने शिखरला याबाबत वॉर्निंग दिली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे.