JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॅालिवूड स्टार्स गाजवणार मैदान

IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॅालिवूड स्टार्स गाजवणार मैदान

31 मार्च रोजी या आयपीएलचे बिगुल वाजणार असून पहिला सामना हा चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात रंगणार आहे. सामन्यापूर्वी आयपीएलच्या 16 व्या सीजनच्या ग्रँड ओपनिंगमध्ये बॉलिवूड स्टार्स त्यांच्या परफॉर्मन्सचा तडका लावणार आहेत.

जाहिरात

IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॅालिवूड स्टार्स गाजवणार मैदान

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मार्च : जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा आता लवकरच सुरु होणार आहे. 31 मार्च रोजी या स्पर्धेचे बिगुल वाजणार असून पहिला सामना हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गतविजेता गुजरात टायटन यांच्यात रंगणार आहे. परंतु सामन्यापूर्वी आयपीएलच्या 16 व्या सीजनच्या ग्रँड ओपनिंगमध्ये बॉलिवूड स्टार्स त्यांच्या परफॉर्मन्सचा तडका लावणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना पारपडणार आहे. सुमारे 1 लाख प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित राहणार असून सामना सुरु होण्यापूर्वी बॉलिवूड स्टार्स या दिमाखदार सोहळ्यात डान्स आणि गाण्याचे सादरीकरण करणार आहेत. क्रिकेटर्स पूर्वी बॉलिवूड स्टार आयपीएलचे मैदान गाजवणार असून यात बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.

आयपीएल च्या आयोजकांनी अद्याप ओपनिंग सेरेमनीमध्ये कोणते बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री रश्मीका मंधाना, तमन्ना भाटिया, कतरीना कैफ, टायगर श्रॉफ, अर्जित सिंह इत्यादी परफॉर्म करणार आहेत. शनिवारी 31 मार्च रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास आयपीएलचा ओपनिंग सोहळा सुरु होणार असून सायंकाळी 7:30 वाजता चेन्नई आणि गुजरात संघामध्ये सामना सुरु होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या