JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : रविवारच्या डबल हेडरने पॉईंट्स टेबल फिरलं, प्ले-ऑफची रेस आणखी थरारक

IPL 2023 : रविवारच्या डबल हेडरने पॉईंट्स टेबल फिरलं, प्ले-ऑफची रेस आणखी थरारक

आयपीएल 2023 चा मोसम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, पण प्ले-ऑफची रेस आणखी रोमांचक झाली आहे.

जाहिरात

हार्दिक ब्रिगेड सुसाट, लखनऊ सुपर जाएंट्सचा दारुण पराभव

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 चा मोसम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, पण प्ले-ऑफची रेस आणखी रोमांचक झाली आहे. रविवारच्या डबल हेडरच्या निकालांमुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. रविवारच्या पहिल्या सामन्यात गुजरातने लखनऊचा तर हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. आयपीएलच्या 10 पैकी 9 टीममध्ये प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी तगडी स्पर्धा रंगली आहे. रविवारच्या सामन्यात हैदराबादने राजस्थानला धूळ चारल्यामुळे ही स्पर्धा आणखी थरारक झाली आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 11 मॅचमध्ये 8 विजय आणि 3 पराभवांमुळे 16 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नईने 11 पैकी 6 मॅच जिंकल्या आणि 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली, त्यामुळे 13 पॉईंट्ससह चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनऊने 11 पैकी 5 विजय आणि 5 पराभव पत्करले, तर त्यांचाही एक सामना रद्द झाला, त्यामुळे लखनऊच्या खात्यात 11 पॉईंट्स आहेत, म्हणून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राजस्थान, आरसीबी, मुंबई आणि पंजाब यांनी 10 पैकी 5 मॅच जिंकल्या तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. नेट रनरेटमुळे या टीम चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांच्याकडेही प्रत्येकी 8 पॉईंट्स आहेत. या तीन टीमही नेट रनरेटमुळे शेवटच्या तीन क्रमांकावर आहेत. या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर फक्त गुजरातची टीमच प्ले-ऑफमध्ये सहज पोहोचण्याची शक्यता आहे. उरलेल्या तीन जागांसाठी अजूनही 9 टीममध्ये स्पर्धा रंगणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या