JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : MS Dhoni ची मैदानातली अशी अवस्था, चाहते पडले चिंतेत, मैदानातला Video

IPL 2023 : MS Dhoni ची मैदानातली अशी अवस्था, चाहते पडले चिंतेत, मैदानातला Video

धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यात धोनीची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.

जाहिरात

MS Dhoni ची मैदानातली अशी अवस्था, चाहते झाले चिंतेत, मैदानातला Video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एम एस धोनी आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये  चांगल्या फॉर्मात खेळताना दिसत आहे. धोनीचे हे शेवटचे सीजन असून तो यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याने त्याचे फॅन्स मोठ्या संख्येने चेन्नईची मॅच पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. अशातच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यात धोनीची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात धोनी मैदानावर फलंदाजीची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी शॉट खेळल्यानंतर रन घेण्यासाठी धावत असताना लंगडताना दिसतोय. धोनीला धावताना होणारा त्रास पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. धोनीच्या फॅन पेजवर अपलोड झालेल्या या व्हिडिओत धोनीच्या पूर्वीच्या रनिंगचा आणि आताच्या रनिंगची तुलना करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

धोनी पूर्वी रन घेत असताना चित्त्याच्या वेगाने धावायचा मात्र आता तो लंगडताना दिसतो. यावर एका चाहत्याने कमेंट केली की, ‘आपल्याला धोनीला खेळताना पाहणे खूप आवडते मात्र आता त्याला अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे.’ धोनीचा असा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांचे ह्रदय पिळवटून निघत आहे. धोनीचाहा 11 सेकंदाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर धोनीचा हा शेवटचा हंगाम तर नाही अशी शंका चाहत्यांच्या मनात आल्या वाचून राहणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या