JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 Final Match : विजयानंतर MS Dhoni ने मॅच विनर रवींद्र जडेजाला दिली 'जादू की झप्पी'

IPL 2023 Final Match : विजयानंतर MS Dhoni ने मॅच विनर रवींद्र जडेजाला दिली 'जादू की झप्पी'

चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा पराभव करून तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपदं पटकावले आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला, या विजयानंतर कर्णधार धोनीने मॅच विनर रवींद्र जडेजाला जादू की झप्पी दिली.

जाहिरात

विजयानंतर MS Dhoni ने मॅच विनर रवींद्र जडेजाला दिली 'जादूकी झप्पी'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 30 मे : आयपीएल 2023 मधील अंतिम सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. यासामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा पराभव करून तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपदं पटकावले आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सवर 5  विकेट्सने विजय मिळवला, या विजयानंतर कर्णधार धोनीने मॅच विनर रवींद्र जडेजाला जादू की झप्पी दिली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स  यांच्यात अंतिम सामना रंगला. यासामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एम एस धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  तेव्हा गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन 214 धावा केल्या. गुजरातने विजयासाठी चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 215 धावांचे आव्हान दिले असताना चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज मैदानात आले. परंतु पहिली ओव्हर सुरु होताच मैदानावर पावसाचे आगमन झाले. पावसाच्या अडथळ्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला पण यावेळी चेन्नईला विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचे आव्हान मिळाले. चेन्नई सुपरकिंग्सच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. चेन्नईच्या लागोपाठ 3 विकेट गेल्यामुळे शेवटच्या काही ओव्हर शिल्लक असताना सामना गुजरातकडे झुकला असे वाटत असताना रवींद्र जडेजाने तुफान फटकेबाजी करून विजय चेन्नईसाठी खेचून आणला. ms dhoni pull up ravindar jadeja

विजयानंतर MS Dhoni ने मॅच विनर रवींद्र जडेजाला दिली ‘जादूकी झप्पी’

रवींद्र जडेजाने 2 चेंडूत 10 धावांचे आवश्यकता असताना शेवटून दुसऱ्या बॉलवर सिक्स मारला. तर शेवटच्या बॉलवर 4 धावा हव्या असताना त्याने चौकार ठोकत सामना जिंकला. रवींद्र जडेजाने खेळलेल्या मॅच विनिंग खेळीनंतर एम एस धोनीने मैदानात धाव घेत जडेजाला पिठी मारून उचलून घेतले. सध्या या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या