CSK च्या गुहेत राजस्थानची डरकाळी, स्पिनर्स समोर चेन्नईच लोटांगण
मुंबई 12 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पारपडला. यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईने सुपरकिंग्सचा पराभव केला आहे. राजस्थानने चेन्नईचा 3 धावांनी पराभव केला. रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर चेन्नईच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. चेन्नईचे होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडीयमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यात सुरुवातीला चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर हे दोघे मैदानात आले. परंतु यशस्वीने 10 धावा केल्यावर दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट पडली. त्यानंतर जॉस बटलर आणि पदिक्कल या दोघांनी काही वेळ डाव सावरला. राजस्थानकडून जॉस बटलरने सर्वोच्च 52 धावा केल्या. तर यासह पदिक्कलने 38, आर अश्विनने 30 , हेटमेयरने 30धावा केल्या. तर संजू सॅमसन सहा इतर काही फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.
राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. विजयासाठी १७६ धावांचे आव्हान मिळालेल्या चेन्नईच्या संघाची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. ओपनिंग बॅट्समन ऋतुराज गायकवाड 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर कॉनवे आणि रहाणेने सीएसकेचा डाव सावरला. परंतु 20 व्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेची विकेट पडली. चेन्नईकडून कॉनवेने 50, अजिंक्य राहणेने 38, रवींद्र जडेजाने 25 तर कर्णधार एम एस धोनीने 32 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनी आणि जडेजाच्या खेळीमुळे सामना अत्यंत रोमांचक ठरला. परंतु अखेर चेन्नईला शेवटच्या बॉलमध्ये 3 धावा न करता आल्यामुळे राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला.