JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : ग्रीनचा बुलेट शॉट, जडेजाचा सनसनाटी कॅच, Video

IPL 2023 : ग्रीनचा बुलेट शॉट, जडेजाचा सनसनाटी कॅच, Video

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. दरम्यान चेन्नईचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने स्वतः टाकलेल्या बॉलवर घेतलेला सनसनाटी कॅच पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जाहिरात

ग्रीनचा बुलेट शॉट, जडेजाचा सनसनाटी कॅच, Video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 एप्रिल : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. आरसीबी विरुद्ध आयपीएल 2023 चा पहिला सामना हरलेली मुंबईत इंडियन्स होम ग्राउंडवर विजयी पताका लावण्यासाठी मैदानात झुंज देत आहे. दरम्यान चेन्नईचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने स्वतः टाकलेल्या बॉलवर घेतलेला सनसनाटी कॅच पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचा सामना खेळत आहे. एम एस धोनीने या सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीने घेतलेला निर्णय त्याच्या गोलंदाजांनी खरा ठरवला आणि 15 ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सकडून कोणत्याही फलंदाजाला संघासाठी समाधानकारक कामगिरी करता आली नाही. एका मागोमाग एक विकेट पडत असताना रवींद्र जडेजा ने कॅमेरून ग्रीनची घेतलेली विकेट सर्वाधिक लक्षवेधी ठरली.

संबंधित बातम्या

रवींद्र जडेजाने 8 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला. यावेळी त्याने स्ट्राईकवर असलेल्या कॅमेरून ग्रीनला ओव्हरमधील पहिलाच बॉल टाकला. या बॉलवर ग्रीन शॉट मारायला गेला परंतु त्याच्या समोरच उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाने क्षणार्धात हा जबरदस्त कॅच पकडला. ग्रीनने मुंबईसाठी 11चेंडूत केवळ 12 धावा केल्या. रवींद्र जडेजाने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या