गावसकरांच्या लाईव्ह कॉमेंट्रीवर भडकला रायुडू, त्या वक्तव्यावर प्रत्युत्तर
मुंबई, 28 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सचा 32 धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणाऱ्या अंबाती रायुडूने फलंदाजीत खराब प्रदर्शन केले. यामुळे सामन्यादरम्यान लाईव्ह कॉमेंट्री करताना माजी क्रिकेटर सुनील गावस्करयांनी रायुडूच्या खेळाबाबत आक्षेप घेऊन सडकून टीका केली. सुनील गावकसरांच्या या टीकेवर आता अंबाती रायुडूने प्रतिउत्तर दिले आहे. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने तुफान फटकेबाजी करून चेन्नई समोर विजयासाठी 203 धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईची फलंदाजी सुरु असताना कर्णधार धोनीने अंबाती रायुडूला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी मैदानात उतरवले. परंतु रायुडू फलंदाजीत कोणताही इम्पॅक्ट दाखवू शकला नाही आणि दोन बॉलमध्ये 0 धावा करून बाद झाला.
रायडूची ही खेळी पाहून माजी क्रिकेट सुनील गावसकर यांनी रायुडूवर टीका केली. ते म्हणाले, “तुम्ही मैदानात फिल्डिंग केली नाहीत आणि फक्त फलंदाजीसाठी मैदानात आलात, तुम्हाला मोठे शॉट्स खेळायचे होते. पण असे होऊ शकत नाही की तुम्ही लगेच फलंदाजीला जाल आणि मोठे फटके खेळायला लागाल. पृथ्वी शॉच्या बाबतीतही तेच पाहिलं. या खेळाडूंनी ना क्षेत्ररक्षण केले ना धावा केल्या. रायुडू केवळ 2 चेंडू खेळला आणि खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला”.
माजी क्रिकेटर सुनील गावसकरांच्या या वक्तव्यावर अंबाती रायुडूने ट्विट करत याला प्रतिउत्तर दिले तो म्हणाला, “जीवनात आणि खेळात चढ-उतार येतात. आपल्याला फक्त सकारात्मक राहण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. यातून गोष्टी नक्कीच बदलतील. जर आपण कठोर परिश्रम केले नाही तर परिणाम देखील आपल्या बाजूने होणार नाही. म्हणूनच हसत राहा आणि मेहनत करत राहा”.