JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : रिटायरमेंटनंतर अंबाती रायुडूचं राजकारणात पदार्पण, या पक्षातून निवडणूक लढणार!

IPL 2023 : रिटायरमेंटनंतर अंबाती रायुडूचं राजकारणात पदार्पण, या पक्षातून निवडणूक लढणार!

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. रायुडूने ट्वीट करून त्याच्या निवृत्तीबाबतची माहिती दिली आहे.

जाहिरात

अंबाती रायुडूची राजकारणात एण्ट्री!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मे : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. रायुडूने ट्वीट करून त्याच्या निवृत्तीबाबतची माहिती दिली आहे. आयपीएल 2023 ची चेन्नई-गुजरात यांच्यातली फायनल आपला शेवटचा सामना असेल, असं अंबाती रायुडू म्हणाला आहे. आयपीएलमध्ये अंबाती रायुडू दोन मोठ्या टीमकडून खेळला. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन टीमचा तो भाग होता. आयपीएल कारकिर्दीमध्ये रायुडू 14 मोसमांमध्ये 204 सामने आणि 8 प्ले-ऑफ खेळला. ‘आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममध्ये मी होतो, रविवारी सहावी ट्रॉफी मिळेल अशी अपेक्षा आहे. गुजरात टायटन्सविरुद्धची मॅच माझ्या आयपीएल करिअरची शेवटची मॅच असेल. ही स्पर्धा खेळण्याचा अनुभव अद्भूत होता. सगळ्यांचे धन्यवाद’, असं ट्वीट अंबाती रायुडूने केलं आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नईने अंबाती रायुडूला 6.75 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याने 203 सामन्यांमध्ये 28.29 च्या सरासरीने 4,329 रन केले. रायुडूने त्याच्या आयपीएल करिअरची सुरूवात मुंबई इंडियन्सकडून कली. 2010 साली तो मुंबईच्या टीममध्ये आला, यानंतर 2017 पर्यंत तो मुंबईसोबत होता. 2018 च्या लिलावाआधी मुंबईने त्याला रिलीज केलं. राजकारणात एण्ट्री? आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अंबाती रायुडू राजकारणात पदार्पण करण्याची शक्यता आहे. एवढच नाहीतर तो वायएसआरसीपी या जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाकडून आंध्र प्रदेशमधून आगामी निवडणूकही लढू शकतो, असं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या