JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : आयपीएल फायनलपूर्वीच CSK ला धक्का, चॅम्पियन खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा

IPL 2023 : आयपीएल फायनलपूर्वीच CSK ला धक्का, चॅम्पियन खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा

आयपीएल 2023 मधील अंतिम सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का बसला असून त्यांच्या चॅम्पियन खेळाडूने रिटायरमेंटची घोषणा केली आहे.

जाहिरात

आयपीएल फायनलपूर्वीच CSK ला धक्का, चॅम्पियन खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, २८ मे : आयपीएल 2023  मध्ये आज अंतिम सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का बसला असून त्यांच्या चॅम्पियन खेळाडूने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. सीएसकेचा अनुभवी खेळाडू अंबाती रायडूने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सीएसके आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 मधील अंतिम सामना हा त्याचा शेवटचा सामना असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी आयपीएल 2023 चा अंतिम सामना गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात पारपडणार आहे. यंदा चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता होती. परंतु एम एस धोनी पूर्वीच चेन्नईचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने  क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. अंबाती रायडूने रविवारी आयपीएल २०२३ फायनलच्या काही तास आधी त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ही निवृत्तीची बातमी दिली. त्याने लिहिले, “मुंबई आणि सीएसके या 2 उत्कृष्ट टीम, 204 सामने, 14 सीजन, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी हा खूप मोठा प्रवास आहे. मी ठरवले आहे की आज चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात खेळवला जाणारा सामान माझा शेवटचा सामना असेल. ही महान स्पर्धा खेळताना मला खरोखर आनंद झाला आहे. तुम्हा सर्वांचे आभार. यू टर्न घेणार नाही”.

संबंधित बातम्या

अंबाती रायडूच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतु त्याचे फॅन्स सोशल मीडियावर त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या