JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : युजवेंद्र चहल करणार 'हल्ला बोल', नव्या रॉयल आर्मीत दाखल

IPL Auction 2022 : युजवेंद्र चहल करणार 'हल्ला बोल', नव्या रॉयल आर्मीत दाखल

टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलला (Yzvendra Chahal) नवी आयपीएल टीम मिळाली आहे. तो यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 12 फेब्रुवारी : टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलला (Yzvendra Chahal) राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) खरेदी केले आहे. राजस्थाननं चहलवर 6 कोटी 50 लाखांची बोली लावली. आता चहल राजस्थानकडून आर. अश्विनच्या जोडीनं बॉलिंग करणार आहे. चहल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) यशस्वी स्पिनर आहे. त्यानं 114 आयपीएल मॅचमध्ये 7.59 च्या इकोनॉमी रेटनं 139 विकेट्स घेतल्या आहेत. आरसीबीकडून 100 पेक्षा जास्त आयपीएल मॅच खेळणारा चहल हा तिसरा खेळाडू आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळेच त्याची टीम इंडियात निवड झाली.

संबंधित बातम्या

टीम इंडियाकडूनही चहलनं छाप पाडली आहे. त्याने 61 वन-डे मध्ये 104 तर 50 टी20 इंटरनॅशनलमध्ये 64 विकेट्स घेतल्या आहेत. 2017 पासून भारतीय टीमचा सदस्य असलेल्या चहलची मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली नव्हती. निवड समितीच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. चहलनंही या निर्णयावर निराशा व्यक्त केली होती. दीपक चहर झाला मालामाल, धोनीच्या टीमनं मोठी किंमत मोजून केली खरेदी टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल झाला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) कॅप्टन झाला. त्यानंतर पुन्हा एकदा चहल टीममध्ये परतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या