'ध्यान से लेना रिव्यू सिस्टम'; माजी क्रिकेटपटूचे धोनीच्या निर्णयावर मजेशीर ट्विट
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: आयपीएल २०२० मध्ये सातव्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी (सीएसके) लीगचा (IPL 2021) हा हंगाम उत्तम राहिला. सीएसकेने आयपीएल 2021 मध्ये 13 पैकी 9 सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. मात्र, कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni)कामगिरी संघाच्या अडचणीत वाढ करत आहे. कारण यापूर्वी डिसीशन रिव्ह्यू सिस्टीम अर्थात DRS ला(DRS) ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ (Dhoni Review System) असे म्हटले जात असे. मात्र, धोनीचा हा निर्णय चुकीचा ठरताना दिसत आहे. याच मुद्यावरुन भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी मजेशीर ट्विट केले आहे. अंपायरच्या निर्णयाविरूद्ध धोनीने आत्तापर्यंत कमीतकमी 10 रिव्ह्यू घेतले आहेत. त्यामधील केवळ एकच निकाल धोनीच्या संघाच्या बाजूने राहिला आहे. याच मुद्यावरुन आकाश चोप्रा यांनी मजेशीर ट्विट केले आहे.
पहिल्यांदा ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ पण आता ‘ध्यान से लेना रिव्यू सिस्टम’ असे म्हणत, चोप्रा यांनी सांगितलं आत्तापर्यंत कमीतकमी 10 रिव्ह्यू धोनीचा एकच रिव्ह्यू यशस्वी झाला आहे.
अद्याप धोनीने आपल्या बॅटची जादु दाखवलेली नाही. त्याने आत्तापर्यंत 13 सामन्यात केवळ 84 धावा केल्या आहेत. त्याच्या फंलदाजीसह त्याच्या कर्णधारपदाचीही चाचणी होत आहे. दिल्लीविरुद्धच्या (DC vs CSK) सामन्यात धोनीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. आयपीएल इतिहासातली धोनीची ही सगळ्यात संथ खेळी (कमीत कमी 25 बॉल खेळून) ठरली. रॉबिन उथप्पाची विकेट गेल्यानंतर धोनी बॅटिंगला आला आणि 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला आवेश खानने त्याला माघारी पाठवलं. धोनीने 27 बॉलमध्ये 18 रन केले, यात त्याला एकही फोर किंवा सिक्स मारता आली नाही. 66.67 च्या स्ट्राईक रेटने धोनीने बॅटिंग केली. याआधी 2008 साली धोनीने संथ खेळी केली होती. डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 74.19 च्या स्ट्राईक रेटने 23 रन केले होते, त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 74.19 एवढा होता