JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : 50 दिवस चालणार IPLचा थरार! एका क्लिकवर पाहा 13व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक

IPL 2020 : 50 दिवस चालणार IPLचा थरार! एका क्लिकवर पाहा 13व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. या हंगामाचे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयनं जाहीर केले आहे.

जाहिरात

मार्च 2020मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये असली तरी, हे हंगाम अनेक खेळाडूंचे करिअर तारू शकते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 फेब्रुवारी : आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. या हंगामाचे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयनं जाहीर केले आहे. त्यानुसार 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज असा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. तर, अंतिम सामना 24 मे रोजी खेळवला जाईल. पहिल्यादाच या हंगामात केवळ 6 सामने दुपारी खेळवले जाणार आहेत. यंदा 57 दिवसांचा हा हंगाम असणार आहे. या हंगामात रविवारी फक्त 2 सामने खेळवले जातील. तर, रात्रीच्या सामन्यांची वेळ नेहमीप्रमाणे 8 वाजताची असेल. आयपीएलआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर 11 दिवसांतच आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल.

संबंधित बातम्या

असे आहे आयपीएलचे वेळापत्रक 29 मार्च-मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-मुंबई 30 मार्च-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब-दिल्ली 31 मार्च-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स-बेंगळुरू 01 एप्रिल-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स-हैदराबाद 02 एप्रिल-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स-चेन्नई 03 एप्रिल-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स-कोलकाता 04 एप्रिल-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद-मोहाली 05 एप्रिल-मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-मुंबई 05 एप्रिल-राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स-गुवाहाटी 06 एप्रिल-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-कोलकाता 07 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद-बेंगळुरू 08 एप्रिल-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स-मोहाली 09 एप्रिल-राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स-गुवाहाटी 10 एप्रिल-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-दिल्ली 11 एप्रिल-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब-चेन्नई 12 एप्रिल-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स हैदराबाद 12 एप्रिल-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स-कोलकाता 13 एप्रिल-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-दिल्ली 14 एप्रिल-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-मोहाली 15 एप्रिल-मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स-मुंबई 16 एप्रिल-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स-हैदराबाद 17 एप्रिल-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-मोहाली 18 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स-बेंगळुरू 19 एप्रिल-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स-दिल्ली 19 एप्रिल-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद-चेन्नई 20 एप्रिल-मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब-मुंबई 21 एप्रिल-राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद-जयपूर 22 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स-बेंगळुरू 23 एप्रिल-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब-कोलकाता 24 एप्रिल-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स-चेन्नई 25 एप्रिल-राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-जयपूर 26 एप्रिल-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स-मोहाली 26 एप्रिल-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स-हैदराबाद 27 एप्रिल-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-चेन्नई 28 एप्रिल-मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स-मुंबई 29 एप्रिल-राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब-जयपूर 20 एप्रिल-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-हैदराबाद 01 मे-मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स-मुंबई 02 मे-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स-कोलकाता 03 मे-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब-बेंगळुरू 03 मे-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद-दिल्ली 04 मे-राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-जयपूर 05 मे-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-हैदराबाद 06 मे-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स-दिल्ली 07 मे-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स-चेन्नई 08 मे-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स-मोहाली 09 मे-मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद-मुंबई 10 मे-चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई 10 मे-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-कोलकाता 11 मे-राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स-गुवाहटी 12 मे-सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब-हैदराबाद 13 मे-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स-दिल्ली 14 मे-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-बेंगळुरू 15 मे-कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद-कोलकाता 16 मे-किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स-मोहाली 17 मे-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स-बेंगळुरू असे आहेत मुंबईचे सामने 29 मार्च- चेन्नई सुपर किंग्ज vs मुंबई इंडियन्स (मुंबई) 1 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स (हैदराबाद) 5 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs मुंबई इंडियन्स (मुंबई) 8 एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब vs मुंबई इंडियन्स (मोहाली) 12 एप्रिल- कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स (कोलकाता) 15 एप्रिल- राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स (मुंबई) 20 एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब vs मुंबई इंडियन्स (मुंबई) 24 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज vs मुंबई इंडियन्स (चेन्नई) 28 एप्रिल- कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स (मुंबई) 1 मे – दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स (मुंबई) 6 मे- दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स (दिल्ली) 9 मे- सनरायजर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स (मुंबई) 11 मे - राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स (गुवाहटी) 17 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs मुंबई इंडियन्स (बेंगळुरू) 50 दिवस चालणार आयपीएल क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार, या हंगामातील सामना 29 मार्च ते 17 मे दरम्यान खेळले जातील. आयपीएलचा 12वा हंगाम 44 दिवस चालला होता, तर तेरावा हंगाम 50 दिवस चालणार आहे. या हंगामाचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयल्स वगळता इतर सर्व संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होतील. तर राजस्थान संघाचे सामने गुवाहटी येथे होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या