नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे (IPL 2020) केवळ दोन लीग सामने शिल्लक असताना अद्याप कोणते 4 संघ प्लेऑफ गाठणार (Playoff) हे निश्चित झाले नाही आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्ले ऑफ गाठणार एकमेव संघ ठरला आहे. आता खरी लढत ही रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC ), कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे. हैदराबाद वगळता इतर तिन्ही संघाचे सध्या 14 गुण आहेत. दरम्यान, आज महत्त्वपूर्ण दिल्ली विरुद्ध बॅंगलोर (RCB vs DC) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यानंतर कोणता संघ क्वालिफाय होणार हे स्पष्ट होईल. सध्या या संघांमध्ये रनरेटचा खेळ आहे. 14 गुण असेलल्या या तिन्ही संघांचा रनरेट मायनसमध्ये आहे. 12 गुण असलेल्या हैदराबादचा रनरेट (0.555) प्लसमध्ये आहेत. त्यामुळे बॅंगलोरचा मोठ्या फरकानं आजचा सामना जिंकावा लागेल. वाचा- खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल! …तरच KKR गाठू शकते प्लेऑफ कोलकाता (KKR)विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा 60 रनने पराभव झाला आहे. त्यामुळे 14 गुणांसह कोलकाताचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र आज क्वालिफाय होण्यासाठी दिल्ली विरुद्ध बॅंगलोर यांच्यात सामन्यात 22 किंवा त्याहून अधिक धावांनी बॅंगलोरनं सामना गमावणं किंवा दिल्लीनं 18 किंवा त्याहून अधिक धावांनी सामना गमावणं गरजेचं आहे. जर, या दोन्ही संघांनी या धावांपेक्षा कमी धावांनी सामना गमावला तर दोन्ही संघ आज प्लेऑफसाठी क्वालिफाय होतील. त्यानंतर KKRला मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. वाचा- IPL 2020 : ‘ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता’, दिग्गज क्रिकेटपटूचा निशाणा विराट-श्रेयस यांची अग्निपरीक्षा या दोन्ही संघांनी सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. मात्र अखेरचे सामने दोन्ही संघांनी गमावले. बॅंगलोरला हैदराबादनं नमवले. तर दिल्लीनं सलग चार सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांना क्वालिफाय होण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल.