मुंबई, 18 सप्टेंबर : आयपीएल (IPL 2020) स्पर्धेचा शुभारंभ 19 सप्टेंबरपासून होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. गतविजेता मुंबईचा संघ या हंगामातही प्रबळ दावेदार असला तरी चेन्नईचा संघ गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे. मात्र त्याआधीच युएइमध्ये होणाऱ्या आयपीएलवर सट्टेबाजारात मोठी उलथापालथ होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ बुकींचा आवडता आहे. मुंबई संघावर 4.90 रुपये इतका भाव लावण्यात आला आहे. मुंबई मागोमाग हैदराबादच्या संघाला बुकींकडून पसंती दिली जात आहे. कोरोनामुळे भारतात मार्चमध्ये होणारी आयपीएल स्पर्धा आता सप्टेंबरमध्ये आयोजित केली जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह प्रचंड आहे. मात्र ही स्पर्धा सुरू होण्याआधीच गुरुग्राम पोलिसांनी त्यांची इंटेलिजंट विंग, क्राईम ब्रांचचा एक चमू आणि सर्व जिल्ह्यांतील स्टेशन ऑफिसर यांना सट्टेबाजांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे सट्टेबाजाराला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असताना बुकींनी मात्र आपल्या आवडत्या संघासाठी भावही ठरवले आहेत. वाचा- रोहित शर्माची चिंता वाढली, मुंबई इंडियन्सची ‘ही’ बाजू अजूनही कमकुवतच गतविजेता संघ मुंबई इंडियन्स यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाचवा आयपीएल किताब जिंकण्यासाठी सज्ज आहे. मात्र मुंबईबरोबर सट्टेबाजारात इतर संघांवरही चांगली बोली लावली जात आहे. वाचा- मुंबई, चेन्नई नाही तर ‘हा’ संघ होणार IPL 2020 चॅम्पियन! दिग्गज खेळाडूने सांगितले असा आहे संघांचा भाव मुंबई इंडियन्स (MI)- 4.90 रुपये सनरायजर्स हैदराबाद (SRH) - 5.60 रुपये चेन्नई सुपरकिंग्ज- 5 रुपये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 6.20 रुपये दिल्ली कॅपिटल्स- 6.40 रुपये कोलकाता नाइट रायडर्स- 7.80 रुपये किंग्ज इलेव्हन पंजाब - 9.50 रुपये राजस्थान रॉयल्स- 10 रुपये वाचा- IPLच्या इतिहासातले 8 जबरदस्त कॅच, तुम्हाला हैराण करणारे हे क्षण पुन्हा पाहाच! मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्ग्लेघन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, प्रिंस बलवंत राय सिंह, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, जयंत यादव, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कूल्टन नाइल, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, जेम्स पॅटिंसन. **चेन्नईचा संघ-**शेन वॉट्सन, फाफ ड्युप्लेसिस, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केदार जाधव, रविंद्र जडेजा. ड्वेन ब्राव्हो, मिशेल सॅटनर, इमरान ताहीर, दीपक चाहर, पियूष चावला. शार्दूल ठाकूर, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, नारायण जगदेशन, मोनू कुमार, सॅम कुरन, कर्ण शर्मा, आर साई किशोर, केएल असीफ, लुंगी नग्धी, जोश हेजलवूड