JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पंचांसमोर अॅटिट्यूड दाखवणं पोलार्डच्या अंगलट, बर्थ डेला मिळालं शिक्षेचं गिफ्ट

पंचांसमोर अॅटिट्यूड दाखवणं पोलार्डच्या अंगलट, बर्थ डेला मिळालं शिक्षेचं गिफ्ट

वाइड बॉल न दिल्याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणं मुंबई इंडियन्सचा फलंदाज पोलार्डच्या अंगलट आलं.

जाहिरात

अंतिम सामन्यात मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी करणारा फलंदाज पोलार्डला वेस्ट इंडिजने वर्ल्ड कपच्या संघातून वगळले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 13 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात चेन्नईला एका धावेनं पराभूत करून मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. चेन्नई आणि मुंबई यांच्या या सामन्यातही पंचांशी खेळाडूंचा वाद बघायला मिळाला. वाईड बॉल न दिल्याने पोलार्ड पंचांवर भडकला. यावेळी त्याने बॅट हवेत फेकली. त्यानंतर फलंदाजी करताना पुढच्या चेंडूवर गोलंदाजाचा रनअप पूर्ण होईपर्यंत क्रिजवरून बाजूला झाला. पोलार्डच्या अशा कृतीने मैदानावरचे पंच इयन गूल्ड आणि नितिन मेनन यांनी त्याच्याशी चर्चा केली तसेच त्याला इशाराही दिला. मुंबईच्या डावातील शेवटच्या षटकात ड्वेन ब्राव्होच्या पहिल्या चेंडूवर पोलार्डने मारलेला फटका रायडुने अडवला. त्यानंतर दुसऱा चेंडू क्रिज लाइनच्या बाहेर पडला. मात्र, पोलार्ड स्टम्प लाइनच्या बाहेर असल्याने चेंडू वाईड दिला नाही. त्यानंतर तिसरा चेंडूसुद्धा तसाच टाकला. यावेळी पोलार्डने हा चेंडू वाइड समजून सोडून दिला. तेव्हाही पंचांनी वाई़ड दिला नाही. यावेळी भडकलेल्या पोलार्डने हवेत बॅट फेकली. चौथ्या चेंडुवेळी तो थेट वाईड बॉलच्या लाईनवर उभा राहिला. ज्यावेळी गोलंदाज चेंडू फेकण्याच्या तयारीत होता तेव्हा पोलार्ड मैदानातून बाजूला झाला. पोलार्ड़ने केलेल्या अशा प्रकारच्या निषेधानंतर दोन्ही पंचांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोलार्डकडे जाऊन हे चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यावेळीही पोलार्डने पंचांच्या सांगण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. सामन्यानंतर पोलार्डला आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी सामन्याच्या मानधनावर 25 टक्के दंड करण्यात आला आहे. षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर चौकार खेचत पोलार्डने राग काढला. त्याने 25 चेंडूत 41 धावांची वेगवान खेळी केली. यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मुंबईकडून त्यानेच सर्वाधिक धावा केल्या. मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या