भारतीय वंशातील सर्वात हॉट महिला रेसलर, छोट्याशा करिअरमध्ये कमावलं मोठं नाव
WWE म्हणजे वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमधील रेसलर आणि त्यांच्या खेळीचे जगभरात चाहते आहेत. WWE मध्ये भारतीय रेसलर्सनेदेखील हजेरी लावली आहे. एकेकाळी ‘द ग्रेट खली’देखील या मॅचेस खेळायचा. सध्या भारतीय वंशाच्या एका महिला रेसलरची जोरदार चर्चा आहे. तिचं नाव सरिना संधू आहे. सरिना ही WWE मधील सर्वात सुंदर महिला रेसलर मानली जाते. तिने तिच्या छोट्याशा करिअरमध्येही मोठं नाव कमावलं आहे. आज तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. 1. सरिना संधू WWE मधील सर्वात सुंदर महिला रेसलर्सपैकी एक आहे. तिने 2015 मध्ये रेसलिंगला सुरुवात केली होती. 2. रेसलिंगमध्ये अल्पावधीतच नाव कमावणारी सरिना मुळची भारतीय वंशाची आहे. यापूर्वी द ग्रेट खली आणि रिंकू सिंग यांनी WWE मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. भारताशी पंगा पाकिस्तानला महागात; आशिया कपचे महत्त्वाचे सामने श्रीलंकेत, शेड्युल ठरलं 3. ती कॅलिफोर्नियामधील सॅन पॅब्लो शहराची रहिवासी आहे. 4. सरिना कॅलिफोर्नियामध्येच लहानाची मोठी झाली. तिचे पूर्वज भारतीय होते, पण ते बऱ्याच वर्षांआधी तिथे स्थायिक झाले. 5. सरिनापूर्वी अनेक भारतीय रेसलर्सनी डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये आपल्या रेसलिंगची जादू दाखवली. पण महिला रेसलर्समध्ये सरिनाने खूप चांगली कामगिरी केली. ती WWE मध्ये भारताच प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखली जाते.
6. सरिना WWE मध्ये येण्यापूर्वी इम्पॅक्ट रेसलिंग करायची. नंतर तिची निवड WWE साठी झाली. 7. सरिनाने दिवा चॅम्पियन शार्लोट फ्लेअरबरोबरही काम केलंय. याशिवाय WWE च्या सर्वात मोठ्या रेसलर्सपैकी एक असलेल्या ट्रिपल एचने देखील सरिनाचं कौतुक केलं होतं. भारताचा बाहुबली रेसलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंगसोबत WWE रिंगमध्ये ट्रिपल एचने तिचे कौतुक केले होते.
8. WWE व्यतिरिक्त सरिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सरिनाचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या WWE फाईट आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सर्व अपडेट्स शेअर करत असते.