JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : चांगल्या सुरुवातीनंतरही भारताची बॅटिंग गडगडली, इंग्लंडने दिला फॉलोऑन

IND vs ENG : चांगल्या सुरुवातीनंतरही भारताची बॅटिंग गडगडली, इंग्लंडने दिला फॉलोऑन

इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही भारतीय महिला टीमची (India Women vs England Women) बॅटिंग गडगडली, त्यामुळे इंग्लंडने टीम इंडियाला फॉलोऑन दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्रिस्टल, 18 जून : इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही भारतीय महिला टीमची (India Women vs England Women) बॅटिंग गडगडली, त्यामुळे इंग्लंडने टीम इंडियाला फॉलोऑन दिला आहे. ब्रिस्टलमधल्या या टेस्टमध्ये भारताने एकही विकेट न गमावता 167 रन केले होते, पण यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भारताची बॅटिंग कोसळली आणि टीम 231 रनवर ऑल आऊट झाली. शफाली वर्माने (Shafali Varma) 96 रनची खेळी केली. शफाली वर्माची ही पहिलीच टेस्ट आहे. स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) 78 रन केले. फॉलोऑन मिळाल्यानंतर पुन्हा बॅटिंगला आलेल्या भारतीय टीमने 57 रनवर 1 विकेट गमावली आहे. शफाली वर्मा 46 रनवर नाबाद खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर हीदर नाईटने 95 रन, सोफिया डंकलेने 74 रन आणि टॅमी ब्युमोंटने 66 रनची खेळी केली. या तिघींच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने 396/9 वर डाव घोषित केला. भारताकडून स्नेह राणाने (Sneh Rana) 4 आणि दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 3 विकेट घेतल्या. भारतीय महिला टीमने या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 विकेट गमावून 187 रन केले. यानंतर तिसऱ्या दिवशी मधली फळी फॉलोऑन वाचवेल, असं वाटत होतं. पण इंग्लंडच्या बॉलिंगसमोर पटापट भारताच्या विकेट गेल्या. इंग्लंडकडून सोफी एक्सेलस्टोनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. चार दिवसांच्या सामन्यात फॉलोऑन देण्यासाठी 150 रनची गरज असते, त्यामुळे भारताला तिसऱ्या दिवशी आपला स्कोअर 247 रनपर्यंत पोहोचवायचा होता. दिवसाच्या सुरुवातीला हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 4 रनवर आणि दीप्ती शर्माने 29 रनवर नाबाद होती. या दोघी भारताला फॉलोऑन पासून वाचवतील, असं वाटत होतं, पण भारतीय टीमचं हे स्वप्न भंगलं. हरमनप्रीतला तिसऱ्या दिवशी एकही रन करता आली नाही. ती आऊट झाल्यानंतर तळाच्या खेळाडूही पॅव्हेलियनमध्ये परतल्या. दीप्ती शर्मा एकटी खेळपट्टीवर उभी राहिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या