फ्लोरिडा, 03 जुलै : India vs West Indies यांच्यात आज पहिला टी-20 सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याआधीच वेस्ट इंडिजला मोठा फटका बसला आहे. विंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल यानं दुखापतीमुळं माघार घेतली आहे. आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे रसेल सरावही करू शकला नव्हता. त्यामुळं रसेलच्या बदली जेसन मोहम्मद याला संघात स्थान देण्यात आले आहे. भारताविरोधात होणाऱ्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी रसेलची संघात निवड करण्यात आली होती. मात्र रसेलला फिटनेस टेस्ट पास करता आली नाही. वर्ल्ड कप दरम्यानच रसेलला दुखापत झाली होती. त्यानंतर कॅनडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20 स्पर्धेतूनही माघार घेतली होती. वर्ल्ड कपमध्येही साखळी फेरीतील काही सामने रसेल खेळू शकला नव्हता. जेसन मोहम्मदला 9 टी-20 सामन्यांचा अनुभव रसेलच्या जागी संघात घेतलेला जेसन मोहम्मद 32 वर्षांचा असून त्यानं आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजचे कोच फ्लॉयड रेफर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी जेसनला संघात स्थान दिले आहे. जेसनला तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुभव आहे. त्यामुळं तो या मालिकेत चांगली कामगिरी करू शकतो", अशी माहिती दिली. रसेलची जागा घेणे कठिण फ्लॉयड रेफर यांनी, “आंद्र रसेल सारख्या खेळाडूची जागा घेणे कठिण आहे. त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. वेस्ट इंडिजला दोन वेळा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकवण्यात त्यानं मदत केली आहे”, असे सांगितले. वेस्ट इंडिज टी-20 क्रिकेटचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघाला टी-20 चॅम्पियन मानले जाते. विंडिज आणि भारत यांच्यात पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेतील फ्लोरिडाच्या ब्रोवार्ड काऊंटी मैदानावर होणार आहे. तर, तिसरा टी-20 सामना गुरुवारी गुयाना नॅशनल मैदानावर होणार आहे. असा असेल वेस्ट इंडिजचा संघ कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार),अँथनी ब्रेंबल, जॉन कॅपबेल, शेल्डन कॉट्रेल, शिम्रॉन हेटमायर, एविन लुईस, सुनील नरेन, कीमो पॉल, किरन पोलार्ड, निकोलस पूरन, रॉमन पॉवेल, जेसन मोहम्मद , ओशाने थॉमस. SPECIAL REPORT : पुण्याचा ‘छोटा रँचो’, सहावीत शिकणाऱ्या मीतने बनवली कार!