JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ...आणि श्रेयस अय्यर म्हणाला मराठीत सांगू का? VIDEO VIRAL

...आणि श्रेयस अय्यर म्हणाला मराठीत सांगू का? VIDEO VIRAL

न्यूझीलंडमध्ये सातत्यानं आपल्या फलंदाजीनं जबरदस्त कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरचा मराठमोळा अंदाज.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऑकलंड, 27 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेला दुसरा टी-20 सामना भारतानं 7 विकेटनं जिंकला. भारतीय क्रिकेट संघाने 17.3 षटकांतच न्यूझीलंडने दिलेले 133 धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात केएल राहुलनं 50 चेंडूत 57 धावा केल्या. तर, त्याला श्रेयस अय्यरनं 33 चेंडूत 44 धावा करत चांगली साथ दिली. याआधी पहिल्या सामन्यातही श्रेयस अय्यरनं मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली होती. श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळं अखेर भारताला चौथ्या क्रमांकावर चांगला फलंदाज मिळाला आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर श्रेयस अय्यरचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. सामन्यानंतर पत्रकार सुनंदन लेले यांनी श्रेयसला मराठीत जेव्हा मैदान लहान असते तेव्हा काय विचार असतो?, असा सवाल केला. यावर श्रेयसनं मराठीत उत्तर देऊ का?, असे विचारले. त्यानंतर अय्यर मराठीत बोलू लागला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- ‘पंत बडबड करतो आणि राहुल करून दाखवतो’, दिग्गज क्रिकेटपटूने केली ऋषभची मस्करी

वाचा- ‘तुझी जादू पाहण्यासाठी पहाटे उठायचो’, कोबी ब्रायंटच्या मृत्यूनंतर विराट भावूक ‘आक्रमक फलंदाजीचे श्रेय विराटला’ लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार फलंदाजी तसेच फलंदाजी कशी करावी याचे श्रेय भारतीय कर्णधार विराट कोहलीला दिले आहे. श्रेयस अय्यर सामन्यानंतर म्हणाला की, “जेव्हा तुम्ही आव्हानाचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला किती धावांचा पाठलाग करावा लागतो आणि लक्ष्य गाठायला किती धावण्याच्या वेगाची कल्पना येते. विराट कोहली जेव्हा फलंदाजीसाठी जातो तेव्हा त्याने आपल्या खेळीची योजना आखण्याचे उत्तम उदाहरण आहे. मी त्याच्याकडून वैयक्तिकरित्या बरेच काही शिकलो आहे, ज्या प्रकारे तो सामना खेळण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करतो. त्याचा हा पैलू उत्तम आहे आणि मी त्याच्याकडून हे शिकलो आहे”, असे सांगत विराटचे कौतुक केले. वाचा- IPLच्या नियमांत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल! क्रिकेट चाहत्यांवर होणार परिणाम

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या