JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG 1st T20 : इंग्लंडचा टीम इंडियाला धक्का, पहिल्याच मॅचमध्ये मोठा पराभव

IND vs ENG 1st T20 : इंग्लंडचा टीम इंडियाला धक्का, पहिल्याच मॅचमध्ये मोठा पराभव

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 मध्ये टीम इंडियाला (India vs England) पराभवाचा धक्का बसला आहे. भारताने ठेवलेल्या 125 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 2 विकेट गमावून 15.3 ओव्हरमध्येच पूर्ण केला. जेसन रॉयने (Jason Roy) सर्वाधिक 49 रन केले, तर जॉस बटलरने (Jos Buttler) 28 रनची खेळी केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 12 मार्च :  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 मध्ये टीम इंडियाला (India vs England) पराभवाचा धक्का बसला आहे. भारताने ठेवलेल्या 125 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 2 विकेट गमावून 15.3 ओव्हरमध्येच पूर्ण केला. जेसन रॉयने (Jason Roy) सर्वाधिक 49 रन केले, तर जॉस बटलरने (Jos Buttler) 28 रनची खेळी केली. डेव्हिड मलान 24 रनवर नाबाद आणि जॉनी बेयरस्टो 26 रनवर नाबाद राहिला. भारताकडून युझवेंद्र चहलला एक आणि वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट मिळाली. त्याआधी बॅटिंग करताना श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) एकाकी झुंज वगळता भारताचे सगळे खेळाडू अपयशी ठरले. 20 ओव्हरमध्ये भारतीय टीमला फक्त 124-7 पर्यंतच मजल मारता आली. श्रेयस अय्यरने 48 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली, यामध्ये एक सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. इंग्लंडने या मॅचमध्ये भारताला टॉस जिंकून पहिले बॅटिंगला बोलावलं, पण केएल राहुल 1 रनवर, कर्णधार विराट कोहली शून्यवर तर शिखर धवन 4 रन करून माघारी परतले. यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला, पण जलद खेळण्याच्या नादात ऋषभ पंत 21 रन करून आऊट झाला. हार्दिक पांड्यानेही 19 रन केले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर आदिल रशीद, मार्क वूड, क्रिस जॉर्डन आणि बेन स्टोक्स यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय भारतीय टीम मैदानात उतरली होती. रोहित शर्माला पहिल्या दोन मॅचसाठी विश्रांती देण्यात आल्याचं विराट कोहलीने (Virat Kohli) टॉसवेळी सांगितलं. तसंच आपण टॉस जिंकला असता तरी बॉलिंगचाच निर्णय घेतला असता, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये धुकं बॉलरना त्रास देईल, असं विराट म्हणाला. भारतीय टीममध्ये बऱ्याच कालावधीनंतर भुवनेश्वर कुमारचं आगमन झालं आहे. इंग्लंडच्या टीमने मे 2019 पासून कोणतीही टी-20 सीरिज गमावलेली नाही. परदेशातही इंग्लंडने उत्कृष्ठ कामगिरी केली. त्यांनी श्रीलंका, न्यूझीलंड आणि दोनवेळा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. तर दुसरीकडे कोरोनानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडिची कामगिरीही दिमाखदार राहिली आहे. भारतीय टीम केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल इंग्लंडची टीम जेसन रॉय, जॉस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, इयन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, क्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वूड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या