India vs England: कसोटी क्रिकेट इतिहासात (test Match History) असं केवळ तीन वेळा घडलं आहे. ज्यामध्ये एखाद्या लेग स्पिनरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. तब्बल 114 वर्षांनंतर अश्विनने (R Ashwin) इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
चेन्नई: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटच्या डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेत इतिहास रचला आहे. अश्विन कसोटी क्रिकेट इतिहासात डावातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला स्पिनर ठरला आहे. अश्विनने चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या दुसर्या डावात सलामीवीर रॉरी बर्न्सची विकेट घेतली आहे.
कसोटी क्रिकेट इतिहासात असं केवळ तीन वेळा घडलं आहे. ज्यामध्ये एखाद्या लेग स्पिनरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. यापूर्वी 1888 मध्ये बॉबी पील आणि 1907 मध्ये बर्ट वोगलेरने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. 114 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अश्विनने पहिल्याच चेंडूवर विरोधी संघाच्या फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये धाडलं आहे.
रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 55.1 षटकं टाकली आणि 146 धावा दिल्या आहेत. दरम्यान त्याने 5 ओव्हर मेडन देखील टाकल्या असून 3 बळीही घेतले आहेत. कसोटी कारकीर्दीत अश्विनने पहिल्यांदाच एवढी षटकं टाकली आहेत. (फोटो सौजन्य- एपी)
त्याचबरोबर फलंदाजी करताना अश्विनने 91 चेंडूत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने 31 धावांची संयमी खेळी खेळली आहे. त्याने वॉशिंग्टन सुंदरबरोबर सातव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली आहे. (फोटो सौजन्य- एपी)
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 337 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या आहेत.