JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी

WTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी

India vs New Zealand : आयपीएल आणि इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला मात्र संधी देण्यात आली आहे. गिल रोहित शर्मासोबत ओपनिंगला येईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जून : भारत शुक्रवारी 18 जून ते 22 जूनपर्यंत न्यूझिलंडविरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळणार आहे. न्यूझिलंडचा कॅप्टन केन विल्यमसन आणि भारताचा कॅप्टन विराट कोहली हे आयसीसीच्या सलग दुसऱ्या इव्हेंटमध्ये नॉकआउट मॅचमध्ये आमने-सामने असणार आहेत. आयपीएल आणि इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला मात्र संधी देण्यात आली आहे. गिल रोहित शर्मासोबत ओपनिंगला येईल. टीम इंडियाची Playing 11 - रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

संबंधित बातम्या

हे खेळाडू बाहेर - भारतीय टीमने हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना फायनलसाठी निवडलेलं नाही. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये पंजाबकडून ओपनिंग करणाऱ्या या दोघांनी उत्कृष्ट बॅटिंग केली होती. केएल राहुलने सराव सामन्यात शतक केलं, तर मयंक अग्रवालचं टेस्ट रेकॉर्डही चांगलं आहे. मयंकने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन द्विशतकंही केली आहेत, पण तरीही विराटने या दोघांवर विश्वास दाखवला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या