JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं

स्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं

स्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

30 जून : पूनम यादव, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर या फिरकी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर स्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली. भारताने विंडीजला ८ बाद १८३ धावांत रोखलं. यानंतर विजयी लक्ष्य ४२.३ षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंड पाठोपाठ विंडीजला नमवून भारतीय महिलांनी सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयाचं श्रेय जिला जातं ती वादळी शतक ठोकणारी स्मृती मंधाना  सांगलीची आहे . एवढंच नाही तर स्मृती फक्त 20 वर्षांची आहे. तिचा जन्म 18जुलै 1996ला मुंबईत झाला. तिच्या भावाला पाहत ती क्रिकेट खेळायला शिकली . अवघ्या 9व्या वर्षी तिचं महाराष्ट्राच्या अंडर 15 क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन  झालं. आणि तिच्या जोरदार फटाकेबाजीच्या जोरावर तेरा वर्षात तिचं   भारताच्या विश्वचषकाच्या टीममध्ये सिलेक्शन झालं. वनडेमध्ये द्विशतक ठोकणारी ती एकमेव महिला क्रिकेटर आहे. तिची विजय घोडदौड अशीच चालू राहिली तर लवकरच ती महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर ठरू शकते . भारताची पुढची   लढत आता २ जुलैला पाकिस्तानविरुद्ध  होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या