मुंबई, 7 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील मालिका सुरू असतानाच बीसीसीआयनं (BCCI) टीम इंडियाचं (Team India) पुढील दोन वर्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतीय खेळाडूंना दोन आठवडे विश्रांती (Rest) देण्याची मागणी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केली आहे. मात्र BCCI नं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आगामी 15 महिने भारतीय टीमला सतत क्रिकेट खेळायचं आहे. कोरोना ब्रेकमुळे मागील वर्षी अनेक स्पर्धा, दौरे पुढं ढकलाव्या लागल्या आहेत. त्या स्पर्धा या कालावधीमध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय टीमला विश्रांती मिळणार नाही. 2021 ते 2023 या दोन वर्षांचं हे वेळापत्रक असून या कालावधीमध्ये भारतीय टीमला तीन वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे. भारतीय टीमचं संपूर्ण वेळापत्रक एप्रिल – मे 2021 इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) जून – जुलै 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल ( जून) भारत वि. श्रीलंका ( 3 वन-डे, 5 टी20) आशिया कप जुले 2021 भारत वि. झिम्बाब्वे (3 वन-डे) जुलै – सप्टेंबर 2021 भारत वि. इंग्लंड ( 5 टेस्ट) ऑक्टोबर 2021 भारत वि. दक्षिण आफ्रिका (3 वन-डे, 5 टी20) ऑक्टोबर – नोव्हेंबर 2021 ICC T20 वर्ल्ड कप नोव्हेंबर – डिसेंबर 2021 भारत वि. न्यूझीलंड (2 टेस्ट, 3 टी20) भारत वि. दक्षिण आफ्रिका (3 टेस्ट, 3 टी20) जानेवारी ते मार्च 2022 भारत वि. वेस्ट इंडिज (3 वन-डे, 3 टी20) भारत वि. श्रीलंका ( 3 टेस्ट, 3 टी20) एप्रिल - मे 2022 इंडियन प्रीमियर लीग 2022 जून 2022 कोणतीही मालिका नाही जुलै - ऑगस्ट 2022 भारत वि. इंग्लंड ( 3 वन-डे, 3 टी20) भारत वि. वेस्ट इंडिज ( 3 वन-डे, 3 टी20) सप्टेंबर 2022 आशिया कप ऑक्टोबर – नोव्हेंबर 2022 ICC T20 वर्ल्ड कप नोव्हेंबर - डिसेंबर 2022 भारत वि. बांगलादेश (2 टेस्ट, 3 वन-डे) भारत वि. श्रीलंका (5 वन-डे) जानेवारी 2023 भारत वि. न्यूझीलंड ( 3 वन-डे, 3 टी20) फेब्रुवारी – मार्च 2023 भारत वि. ऑस्ट्रेलिया ( 4 टेस्ट, 3 वन-डे, 3 टी20)