JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : टीम इंडिया होणार नंबर 1! पाकिस्तानला मागे टाकणार

IND vs SL : टीम इंडिया होणार नंबर 1! पाकिस्तानला मागे टाकणार

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 7 विकेटने दणदणीत विजय झाला, त्यामुळे भारताने 3 मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता सीरिजची दुसरी वनडे मंगळवारी खेळवली जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलंबो, 19 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 7 विकेटने दणदणीत विजय झाला, त्यामुळे भारताने 3 मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता सीरिजची दुसरी वनडे मंगळवारी खेळवली जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची संधी आहे. टीम इंडियाने आता एक सामना जिंकला तर श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम नावावर होईल. सध्या हे रेकॉर्ड पाकिस्तानच्या (Pakistan) नावावर आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध एकूण 125 मॅच जिंकल्या आहेत, तर भारतानेही 125 सामन्यांमध्ये; श्रीलंकेला पराभूत केलं आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 231 (टेस्ट, वनडे आणि टी20) मॅच खेळल्या आहेत. या यादीत भारत 223 मॅचसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध 154 मॅच खेळल्या आहेत. विजयी टक्केवारीमध्ये मात्र ऑस्ट्रेलियन टीम सगळ्यात पुढे आहे. ऑस्ट्रेलियाने 144 मॅचपैकी 88 मॅचमध्ये श्रीलंकेला धूळ चारली, म्हणजेच त्यांची विजयी टक्केवारी 61.11 एवढी आहे. ऑस्ट्रेलियाला 44 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर 8 मॅच ड्रॉ झाल्या. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी-20 मिळून 223 मॅच खेळल्या, यातल्या 125 मॅचमध्ये भारताचा विजय झाला. भारताची विजयी टक्केवारी 55.85 एवढी आहे. श्रीलंकेने 68 सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला, तर एक मॅच टाय आणि 17 मॅच ड्रॉ झाल्या. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 231 सामने खेळले, यापैकी 125 मॅचमध्ये पाकिस्तानला विजय मिळवला, म्हणजेच त्यांची विजयी टक्केवारी 54.11 एवढी आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 82 मॅच गमावल्या, एक मॅच टाय आणि 19 मुकाबले ड्रॉ झाले. भारताने श्रीलंकेविरुद्ध एकूण 160 वनडे खेळल्या, यातल्या 92 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 56 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 57 टक्के वनडे जिंकल्या आहेत. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 155 सामन्यांपैकी 92 जिंकले. या यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू टीमने लंकेविरुद्ध 97 पैकी 61 वनडे जिंकल्या. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62 एवढी आहे. दुसरी वनडे जिंकली तर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे विजय मिळवणारी टीम होईल. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या टॉप-5 क्रिकेटपटूंमध्ये सध्या खेळत असणारा विराट कोहली हा एकमेव आहे. विराटने 63 सामन्यांमध्ये 3,563 रन केले, यात 13 शतकांचा समावेश आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 5,108 रनसह पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने श्रीलंकेविरुद्ध 17 शतकं केली होती. श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने 84 वनडेमध्ये 3,113 रन केले. दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी (MS Dhoni) आहे, त्याने 2,383 रन केले. तर विराट 2,220 रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 7 सामन्यांमध्ये सर्वाधिक 339 रन केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या