मुंबई, 11 जानेवारी : टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेमध्ये 19 जानेवारीपासून तीन वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे, पण या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs South Africa) मोठा धक्का बसला आहे. 22 वर्षांचा युवा स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे तो वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी जयंत यादवला (Jayant Yadav) टीममध्ये निवडण्यात आलं आहे. जयंत आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळला होता. तसंच तो सध्या भारतीय टेस्ट टीमसोबत दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. जयंत यादवने त्याच्या करियरमध्ये फक्त एक वनडे मॅच खेळली आहे, तीदेखील 6 वर्षांपूर्वी, त्या सामन्यात जयंत यादवने एक रन केली होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वॉशिंग्टन सुंदरऐवजी जयंत यादवला दक्षिण आफ्रिकेमध्येच राहायला सांगण्यात आलं आहे. वॉशिंग्टन सुंदर शिखर धवन, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, इशान किशन, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासोबत मुंबईमध्ये तीन दिवस क्वारंटाईन होता. वनडे टीमचे खेळाडू बुधवारी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतरही खेळाडूंना तीन दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यानंतरच खेळाडू टीमसोबत जोडले जाऊ शकतात. विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं, पण रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही, त्यामुळे केएल राहुलला (KL Rahul) या सीरिजसाठी कॅप्टन्सी देण्यात आली. एक विकेट आणि एक रन जयंत यादवने एक वनडे मॅच खेळली, यात त्याने नाबाद एक रन केली, याशिवाय त्याने एक विकेटही घेतली. ऑक्टोबर 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध जयंत यादव खेळला होता. याशिवाय 5 टेस्टमध्ये त्याने 16 विकेट घेतल्या आहेत, तसंच एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने 246 रन केले. लिस्ट ए करियरमध्ये जयंत यादवने 59 मॅचमध्ये 53 विकेट मिळवल्या आणि 23 च्या सरासरीने 898 रन आणि 5 अर्धशतकं केली.