JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : सहकाऱ्याला बाद करण्यासाठी धावणारे वर्ल्ड कप जिंकायला निघालेत, पाकचे खेळाडू ट्रोल

VIDEO : सहकाऱ्याला बाद करण्यासाठी धावणारे वर्ल्ड कप जिंकायला निघालेत, पाकचे खेळाडू ट्रोल

अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमिफायनलमध्ये भारताविरुद्ध पाकचा कर्णधार रोहेल नजीर आणि कासिम अकरम यांच्यात समन्वय नसल्याने अकरम धावबाद झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पॉचेफस्ट्रूम, 04 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळाडूंवर नेहमीच दबाव असतो. या दबावाखाली खेळाडूंकडून चुका होण्याची शक्यता असते. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंकडून अशीच चूक झाली. पाकचा कर्णधार रोहेल नजीर आणि कासिम अकरम यांच्यात ताळमेळ राहिला नाही आणि अकरम धावबाद झाला. हे दोन्ही खेळाडू स्वत:ला वाचवण्यासाठी एकमेकांना बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत असंच वाटत होतं. सामन्याच्या 31 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज कासिमने फटका मारला. त्यावर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केला. तेव्हा दुसऱ्या बाजूला असलेला रोहेल धावला पण अचानक थांबला आणि मागे फिरला. यावेळी कासमिसुद्धा दुसऱ्या बाजूला पोहोचला होता. दोघेही एका बाजूला पोहोचले तेव्हा भारताच्या अंकोलेकरनं यष्टीरक्षक ध्रुव झुरेलकडे थ्रो केला आणि कासिमला धावबाद केलं. दोघांपैकी नझीर आधी क्रीजमध्ये पोहोचल्यानं कासिम बाद ठरला.

पाक खेळाडूंच्या या धडपडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. रोहेल नझीरच्या चुकीमुळे कासिम 9 धावांवर बाद झाला.

कासिम बाद झाला तरी रोहेल नझीरने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 62 धावा केल्या. मात्र यासाठी त्याने 102 चेंडू खेळून काढले. रोहेलला भारताचा गोलंदाज सुशांत मिश्राने बाद केलं. पाकचा 43 षटकात खेळ खल्लास, फायनलसाठी टीम इंडियासमोर 173 धावांचे आव्हान पाकिस्तानच्या संघाला 50 षटकेही खेळून काढता आली नाहीत. भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा संघ 43.1 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारू शकला. रोहेल नझीर 62 धावा, हैदर अली 56 धावा आणि मोहम्मद हॅरीस 21 धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या सुशांत मिश्राने 28 धावा देत सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला. विराटने केला फेव्हरेट खेळाडूचा पत्ता कट! नयूझीलंड दौऱ्यातून काढलं बाहेर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या