JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मुंबईकर एजाझसाठी R Ashwin ची ट्विटरकडे शिफारस, 'त्याचे अकाउंट ...

मुंबईकर एजाझसाठी R Ashwin ची ट्विटरकडे शिफारस, 'त्याचे अकाउंट ...

भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

जाहिरात

Ravichandran Ashwin & Ajaz Patel

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 डिसेंबर: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भीमप्रराक्रम करणाऱ्या या अश्विनने वानखेडे मैदान गाजवलेला किवींचा स्पिनर एजाझ पटेलसाठी (Ajaz Patel)ट्विटरडे खास शिफारस केली आहे. जी शिफारस सध्या व्हायरल (Definitely deserves to be verified)होत आहे. रविचंद्रन अश्विनने सोमवारी एक ट्विट केले जे सध्या चर्चेत आले आहे. ‘‘डिअर व्हेरिफाय, एका डावात 10 विकेट घेणार्‍या खेळाडूचे अकाउंट  व्हेरिफाय केले पाहिजे. अशी शिफारस करत अश्विनने हे ट्विट एजाझला टॅग केले आहे. ashwin ajazj patel एजाझने भारत विरुद्ध मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व 10 विकेट घेतल्या. ही कामगिरी करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. विशेष बाब म्हणजे या ट्विटला 22 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले असून ते ट्विट करून एजाझ पटेल यांचे अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी ट्विटरला टॅग करत आहेत.अश्विन च्या ट्विटवर एका यूजरने लिहिले की, ‘अर्थात त्याचे अकाउंट व्हेरिफाय केले पाहिजे. तसेच तो मॅन ऑफ द मॅचलाही पात्र होता.’ मॅग्स नावाच्या आणखी एका युजरने लिहिले, ‘एक खरा भारतीय खेळाडू दुसऱ्या देशाच्या खेळाडूला कसा सपोर्ट करतो याचे उदाहरण पहा.’ असे म्हटले आहे. एजाझ पटेलचे ट्विटर अकाउंट पाहिले असता, 11 हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स नसल्याचे लक्षात आले. त्याने 2011 मध्ये ट्विटर अकाऊंट ओपन केले असून केवळ 11 हजार 910 इतकेच फॉलोअर्स आहेत. न्यूझीलंडकडून खेळत असलेल्या एजाझ पटेलचा जन्म मुंबईतच झाला आहे. जन्मानंतर घरच्यांसोबत तो न्यूझीलंडला गेला. तिथेच लहानाचा मोठा झाला आणि न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत त्याने टीम इंडिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या