JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : टीम इंडियात इंग्लंडमध्ये जिंकण्याची क्षमता, चॅपलनी सांगितलं कारण

IND vs ENG : टीम इंडियात इंग्लंडमध्ये जिंकण्याची क्षमता, चॅपलनी सांगितलं कारण

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी भारताला इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज (India vs England) जिंकण्याची संधी असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 4 जुलै : ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी भारताला इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज (India vs England) जिंकण्याची संधी असल्याचं मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाचं शानदार बॉलिंग आक्रमण बघितलं तर आगामी पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा विजय होऊ शकतं, असं भाकीत चॅपल यांनी वर्तवलं. भारताने जरी न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) पराभव स्वीकारला असला तरी त्यांची फास्ट बॉलिंग गेल्या काही वर्षांमध्ये बरीच सुधारली आहे. भारताची फास्ट बॉलिंग भूतकाळातल्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियन टीमसारखी दिसते, असं चॅपल म्हणाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. क्रिकइन्फोमध्ये इयन चॅपल यांनी स्तंभ लिहिला आहे. ‘भारतीय टीम कुशल फास्ट बॉलिंग करणाऱ्या टीमच्या श्रेणीमध्ये पोहोचली आहे. याच कारणामुळे त्यांचा ऑस्ट्रेलियात विजय झाला आणि ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचले. आता त्यांना इंग्लंडला त्यांच्याच मैदानात हरवण्याची संधी आहे. चांगलं फास्ट बॉलिंग आक्रमण असल्याचा फायदा त्यांना मिळू शकतो,’ असं चॅपल यांनी लिहिलं आहे. इयन चॅपल यांनी न्यूझीलंडच्या चार फास्ट बॉलरचंही कौतुक केलं आहे. ‘न्यूझीलंडला फायनलमध्ये टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, नील वॅगनर आणि साईल जेमिसन यांच्या फास्ट बॉलिंगमुळे विजय मिळाला. न्यूझीलंडच्या या बॉलिंगची तुलना वेस्ट इंडिजच्या 1970 ते 1990 च्या दशकातल्या बॉलरशी होऊ शकते,’ असं चॅपल म्हणाले. टीम इंडिया मागच्यावेळी 2018 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली होती, तेव्हा भारताचा 4-1 ने पराभव झाला होता. त्यावेळीही टीमचा कर्णधार विराट कोहलीच (Virat Kohli) होता. इंग्लंडमध्ये भारताने 63 टेस्ट खेळल्या, यातल्या 35 मॅचमध्ये पराभव झाला आणि 7 मॅच जिंकता आल्या. भारताला इंग्लंडमध्ये शेवटची सीरिज राहुल द्रविड (Rahul Dravid) कर्णधार असताना 2007 साली जिंकली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या