JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / हे स्वीकारार्ह नाही, 4 विकेट घेणाऱ्या जडेजावर गावस्कर भडकले

हे स्वीकारार्ह नाही, 4 विकेट घेणाऱ्या जडेजावर गावस्कर भडकले

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने इंदौरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चार विकेट घेतल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग कमी करण्यात यश आलं.

जाहिरात

ravindra jadeja

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदौर, 01 मार्च : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने इंदौरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चार विकेट घेतल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग कमी करण्यात यश आलं. दरम्यान, त्याच्या एका चुकीमुळे भारतीय संघाला मोठ्या अडचणीत टाकलं आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या डावात भारतीय संघाला १०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी लवकर बाद झाला. ट्रेव्हिस हेड फक्त १२ धावाच करू शकला. ट्रेविस बाद झाल्यानतंर मार्नस लॅब्युशेन आणि उस्मान ख्वाजा हे दोघे होते. तेव्हा रविंद्र जडेजाच्या चेंडूवर खातेही न उघडता लॅब्युशेन बोल्ड झाला. भारतीय खेळाडू जल्लोष साजरा करत असताना जडेजाचा तो नो बॉल असल्याचं समोर आलं. यावेळी कमेंट्री करणारे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. IND vs AUS : आठवड्यापूर्वी वडिलांचे निधन, आज उतरला मैदानात सुनील गावस्कर यांनी म्हटलं की, हे स्वीकारण्यासारखं नाही. त्याने काही मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकलेत पण एका फिरकीपटूने नो बॉल टाकणं अपेक्षित नाही. मला वाटतं की पारस म्हाब्रेला त्याच्यासोबत बसायला हवं आणि त्याला क्रीजच्या आत राहून गोलंदाजी करायला हवी. लॅब्युशेनला नो बॉल टाकणं भारतीय संघाला महागात पडलं. लॅब्युशेनने ख्वाजासोबत दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली. लॅब्युशेनची विकेट शेवटी रविंद्र जडेजानेच काढली. मात्र ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर ४७ धावांची आघाडी घेतली असून अद्याप त्यांच्या ६ विकेट बाकी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या