JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'गुन्हा आहे हा...', मॅक्सवेलची फलंदाजी पाहून KXIP च्या कोचने केलं हटके ट्वीट

'गुन्हा आहे हा...', मॅक्सवेलची फलंदाजी पाहून KXIP च्या कोचने केलं हटके ट्वीट

भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलचा खेळ पाहिल्यानंतर आयपीएलच्या काही जुन्या आठवणी दिग्गजांच्या मनात ताज्या झाल्या.

जाहिरात

या हंगामात ग्लेन मॅक्सवेलची सर्वोत्तम खेळी 32 आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मॅक्सवेलनं 32 धावा केल्या होत्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या तेराव्या सिझनमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाजी कोच वसीम जाफर याने मजेदार मीम्स ट्वीट केले आहेत. या ट्वीट्सना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या वन डे क्रिकेट सामन्यात वसीम जाफरने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला आणखी एक मजेदार बॉलिवूड मीम शेअर करून ट्रोल केलं. या बॉलीवूड मीमच्या माध्यमातून जाफरने आयपीएलमध्ये मॅक्सवेलच्या फ्लॉप कामगिरीवर बोट ठेवलं आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे क्रिकेट सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतक ठोकले. आयपीएल 13 मध्ये अपयशी ठरल्यानंतर मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाकडून खेळून यश संपादन करत आहे. वन डे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांत त्याने 45 आणि 63 धावांची खेळी केली आहे. या डावांत मॅक्सवेलने चौकार-षटकारांचा पाऊसदेखील पाडला. भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलचा खेळ पाहिल्यानंतर आयपीएलच्या काही जुन्या आठवणी दिग्गजांच्या मनात ताज्या झाल्या. मॅक्सवेलच्या खेळीनंतर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच वसीम जाफरने ट्विटरवर या ऑस्ट्रेलियन फलंदाजावर तिरकस भाष्य केलं आहे. जाफरने बॉलिवूडमधील सरफरोश चित्रपटामधील एका सिनमधील फोटो शेअर केला आहे. या चित्रात अभिनेता नसिरुद्दीन शहा दिसत आहे. त्यात त्यांचा हा डायलॉग आहे ‘गुनाह है यह.’ दुसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल 29 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार आणि चार षटकार सुद्धा मारले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन आणि ग्लेन मॅक्सवेलने शानदार अर्धशतकं ठोकली. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने दुसरे शतक ठोकलं. यासोबतच ऑस्ट्रेलियाने स्कोर बोर्डवर 3 बाद 389 धावा लावल्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून केवळ 338 धावा करू शकला. यासह भारताला 51 धावांनी हरवून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 66 धावांनी पराभव झाला होता. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वन डे सामना 2 डिसेंबरला कॅनबेरा येथे खेळला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या